मुंबई : शिवसेना नेमकी कुणाची ? यावर निर्णय घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपुष्टात आली आहे. त्यामुळे आज निवडणुक आयोग धनुष्य बाणाचा हक्क कोणत्या गटाकडे सुपुर्द करणार? याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली आहे. तत्पुर्वी दोन्ही गटाचे नेते, वकिल दिल्लीत दाखल झाले आहेत. तसेच आज निवडणुक आयोग दुपारी 1 वाजता यावर निर्णय देणार आहे.
“….त्यात निरागसतेला ओढू नका हो..!”; शिवतीर्थावरील टिकेनंतर श्रीकांत शिंदेंच उद्धव ठाकरेंना पत्र
अंधेरी पुर्व विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुक होत असून 14 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापुर्वी केंद्रीय निवडणुक आयोगाकडून निकालाची अपेक्षा आहे. निवडणुक आयोगाने दोन्ही गटांना 7 आक्टोबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. त्यामुळे आज ठाकर गटाच्या वतीने कोणती कागदपत्रे आयोगाला दिली जातात? आयोगासमोर कोणता युक्तिवाद केला जातो ? ते पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
एसटीच्या बुकिंगकरिता 10 कोटीची कॅश कशी घेतली.? कोणी दिली? याची इडी चौकशी करणार का?
त्याआधी शिवसेनेच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी, तसेच अध्यक्षपदी निवड केलेली असल्याने पक्षाचे धनुष्य़बाण हे चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता निवडणुक आयोग काय निर्णय घेणार त्यावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची पुढची दिशा अवलंबून आहे.
“शिंदेंचं भाषण म्हणजे भाजपने लिहून दिलेली रटाळ बोअर क्रिप्ट”
दरम्यान, राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता निवडणुक आयोग चिन्ह गोठवण्याची जास्तच शक्यता आहे. कारण यावर एका बाजूने निर्णय देणे निवडणुक आयोगाला जास्त जिकरीचे ठरणार आहे. त्यामुळे जर निवडणुक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यास उद्धव ठाकरे यांनी ढाल-तलवार किंवा गदा या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवली आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबत राजकीय वर्तुळात सल्लामसलत करून निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर य़ेत आहे.
Read also
- शिवसेना नेमकी कुणाची ? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? निवडणुक आयोगाचा निर्णय?
- “सुषमाताई..! आमच्यासारख्या जुन्या शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर…”; शुंभुराज देसाई
- ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणाऱ्या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच ; राष्ट्रवादीचा आरोप
- दहा डोक्याचा नाही तर 50 खोक्यांचा खोकासुराचं शिवाजी पार्कवर दहन
- “तुम्हाला कसं काय जमतं बुवा ?” शितल म्हात्रेंचा सुषमा अंधारेंना खोचक टोला