कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर एकामागोमाग एक आरोप करत सुटलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा कोल्हापूर दौरा जाहीर केला आहे. येत्या मंगळवारी 28 सप्टेंबर किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सोमय्यांनी पोलिसांची परवानगी काढली आहे.
वॉर्ड-प्रभागांची कितीही ढवळाढवळ करा, मुंबई महापालिकेवर भाजपचेच कमळ फुलणार – फडणवीस
त्यांच्या मागील दौऱ्याला सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापुरात येऊ न देता कराडमधून माघारी धाडण्यात आले होते. सोमय्यांना परत धाडण्यावरून राज्य सरकारमधील गृह कलह समोर आला होता. त्यामुळे पुढील दौऱ्यात काय होणार ? याची आता उत्सुकता आहे. सोमवारी कोल्हापूरला जाण्यासाठी महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवास सुरू केल्यानंतर मुंबईपासून कराडपर्यंत पोलिस माजी खासदार किरीट सोमय्या यांची कोल्हापूरला जाऊ नये, यासाठी मनधरणी करत होते. ठाण्यासह सातार्यात पोलिसांनी चर्चा करत रेल्वेतून उतरण्याची विनंतीही केली होती.
I have now reschedule My Kolhapur Programs on 28 September, wrote & inform Collector & Police
मी आत्ता 28 सप्टेंबर ला कोल्हापूर जाणार , जिल्हाधिकारी आणि पोलीस ना कळविले आहे @BJP4Maharashtra pic.twitter.com/lkUsNQ9IPM
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 22, 2021
कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी कराड रेल्वेस्टेशनवर कोल्हापूर जिल्हा प्रवेश मनाईचा आदेश किरीट सोमय्या यांच्या हाती दिला आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन कराडच्या विश्रामगृहात आणण्यात आले. मुंबईपासून रविवारी रात्री 8.30 वाजता सुरू झालेला हा आठ तासांचा हाय व्होल्टेज ड्रामा कराडला पहाटे 4.30 वाजता समाप्त झाला. मुंबईतून कोल्हापूरला येत असताना छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेर आपणास अडवण्यात आले होते. तेथे रेल्वे मिळू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रयत्न करत खोटा मनाई आदेश वाचून दाखवला. त्यानंतर आदेशाची मागणी करताच पोलिस पळून गेल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता. रेल्वेने प्रवास सुरू केल्यानंतर ठाण्यातही स्थानिक पोलिसांनी आपणास कोल्हापूरला जाऊ नये, असे सांगत रेल्वेतून उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आपण आदेश दाखवण्याची मागणी केली. पोलिस आदेश दाखवू शकले नाहीत, असे सोमय्या म्हणाले.
Read Also :
- उद्धव ठाकरेंचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक
- राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का? – महिला आमदाराचे पत्र
- मी कुठलीही गोष्ट चुकीची केलेली नाही, सोमय्या विनाकारण प्रतिमा मलिन करतायतं – अनिल परब
- शरद पवारांनी नव्हे काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदार आठवले
- पुण्यातील ॲमिनिटी स्पेसच्या मुद्यावरुन भाजप बॅकफूटला; राष्ट्रवादी काँग्रेसकडून निर्णयाचे स्वागत