बीड : भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्यानंतर राणे यांना पोलिसांनी अटक देखील केली होती. मात्र, राणे यांना जमीन मिळाला असून, त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. या दोन्ही नेत्याच्या वादात कार्यकर्त्यांनी देखील उडी घेतली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बदल कोणी चुकेचे बोलत तर आम्ही सहन करणार नाहीत. असं बीड जिल्ह्यातील शिवसैनिकानी थेट मंत्री संदीपान भुमरे यांच्या समोर स्पष्ट केलं आहे. येत्या काळात केंद्रीय मंत्री नायरण राणे यांच्या दोनी मुलांना मारणार असल्याचं देखील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांनी म्हटल आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा पेटतो कि काय असं दिसत आहे.
दरोडेखोर परमवीर सिंग यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे; हसन मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
जिल्हातील शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमविण्या मध्येच व्यस्त असल्याचा गौप्यस्फोट देखील यावेळी करण्यात आला. जिल्ह्यात राणेंच्या विरोधी आंदोलनात जिल्हातील पदधिकारी उपस्थित नव्हते मात्र आम्ही उद्धव ठाकरे साहेब यांची बदनामी सहन करणार नाहीत. आणि येत्या काळात नारायण राणे यांच्या दोनी मुलांना मारणार असल्याचे असल्याचं धक्कादायक वक्तव्य आज मंत्री संदीपन भुमरे यांच्या मार्गदर्शन खाली बीडच्या शासकीय विश्रामगृह येथे शिवसेनेच्या आयोजित करण्यात आले.
मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेवण करत असताना पोलीस धडकले आणि त्यांनी राणेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. नारायण राणे यांना संगमेश्वर जवळील गोळवली गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका खासगी रेस्ट हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांना नेण्यात आल्यानंतर राणे समर्थकांनी बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी एका व्हिडिओचा दाखला देत सांगितले की, नारायण राणे जेवत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचे म्हणत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी न्यायालयात ७ दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाने ती नाकारली. भविष्यात असे प्रक्षोभक वक्तव्य करू, नये असे लिहून देण्याची मागणीही पोलिसानी न्यायालयात केली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर नारायण राणेंना जामीनाचा अर्ज मंजूर झाला आहे.
Read Also :
- अनिल देशमुखांना क्लीनचीट मिळालेली नाही, चौकशी सुरुच आहे; सीबीआय’चा मोठा खुलासा
- तब्बल 20 वर्षानंतर गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंच्या घरी गेले; काय होत नेमकं कारण? वाचा सविस्तर…
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार
- दरोडेखोर परमवीर सिंग यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे; हसन मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाला मनःशांती लाभो आणि राज्याला बदनाम न करण्याची सद्बुद्धी मिळो – रोहित पवार