नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज राष्ट्रवादीची संघटनात्मक बैठक आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी, आपल्या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना, राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर प्रसार माध्यमांसमोर बॅटिंग केली. यावेळी, राणे-ठाकरे प्रकरणावर प्रतिकिया व्यक्त करताना, “मला याबद्दल काहीही माहिती नाही. मी काही दिल्लीला गेलेले नाही,” अशी अगदी मोजक्या शब्दात आणि सावध प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मोठी बातमी : मुंबई, कोल्हापूर, पुण्यासह राज्यातल्या अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलणार?
तसेच, “राज्यातील महाविकास आघाडी सरकार २५ वर्षे राज्याची सेवा करेल,” असं विधान करत त्यांनी, मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर भाष्य करताना, “मी इम्पल्सीव्ह नाहीये. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला, ती इन्स्टंट कॉफी नाही आणि मी अशा घटनांवर तातडीने प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही. मला विचार करण्यासाठी वेळ लागतो. पण राजकीय विचारसरणी बाजूला ठेऊन नेत्यांच्या भेटीगाठी होत असतील, तर त्याचं स्वागतच आहे,” असं म्हणत त्यांनी फुग्यातील हवा काढली.
एकनाथ खडसे यांच्यावरील होणारी ED ची कार्यवाही राष्ट्रवादीच्या फायद्याची; सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट
यावेळी, नागपूर मेट्रोत आरक्षण डावलून भरती केली जात आहे. त्यामुळे चौकशीची मागणी होत आहे. यावर बोलताना त्यांनी, “चौकशीची मागणी होत असेल आणि त्यात काही तथ्य असेल, तर सगळ्यांची चौकशी करावी. आमचं सरकार दडपशाहीचं नाहीये. पारदर्शक कारभारासाठीच माहितीचा अधिकार हा मनमोहन सरकारने दिला आहे. आता आत्ताच्या केंद्र सरकारने यावर बऱ्याच यंत्रणा आणल्या आहेत. पण आमचे दोन्हीकडे सरकार असताना, पारदर्शकपणा काय असतो, हे आम्ही दाखवलं आहे,” असं त्या म्हणाल्या.
Read Also :
- “राणेंची यात्रा ‘जन आशीर्वाद’ नाही, ती तर…”, संजय राऊतांनी पुन्हा एकदा डिवचले
- नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
- वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही; नारायण राणेंनी पुन्हा ललकारले
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
- पोलीस आणि गुंडांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार चाललंय – चंद्रकांत पाटील