नागपूर : ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची ५ कोटी ७३ लाखाची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. ED कडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीची चौकशी आमच्यासाठी चांगलीच आहे, असा खुलासा केला आहे. ईडीचा राष्ट्रवादीला नेहमी फायदाच झाला आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. सुप्रिया सुळे आज नागपूरात एका कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
अटक, लीलावतीनंतर योद्धा पुन्हा मैदानात; नारायण राणेंची जन आशीवार्द आज रत्नागिरीतून सुरू
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये केवळ राजकीय वितुष्ट आहेत अशी विधानं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात असताना याबाबत सुप्रिया सुळेंना विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी मिश्किल टोला लगावला.
भाजपाची गांधीगिरी; अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी ७५ हजार पत्र पाठवणार
“शिवसेना-भाजपचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीनं प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपला समर्थन करणाऱ्या ‘राष्ट्रवादी’ची एका रात्रीत पुन्हा पलटी; ॲमेनिटी स्पेसबद्दल भूमिका बदलली
महाविकास आघाडी सरकार भक्कम असून जनतेच्या मनामनात या सरकारनं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे कुणी किती प्रयत्न केले किंवा राजकीय डावपेच आखले तरी त्याचा काही फायदा होणार नाही. कारण केवळ ५ वर्षे नव्हे, तर महाविकास आघाडी सरकार राज्यात पुढची २५ वर्ष काम करणार आहे, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
Read Also :
- नाशकात राजकीय भूकंपाची शक्यता; संजय राऊतांनी भाजपचा माजी उपमहापौर फोडला?
- वरुण सरदेसाई आता परत आला तर माघारी जाणार नाही; नारायण राणेंनी पुन्हा ललकारले
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटा काय करू? – अण्णा हजारे
- पोलीस आणि गुंडांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकार चाललंय – चंद्रकांत पाटील
- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यावर सर्वांचेच एकमत – उद्धव ठाकरे