मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याप्रकरणी सीबीआयचा अहवाल व्हायरल झाल्याचं समोर आलं होतं. या अहवालाप्रकरणी सीबीआयने स्पष्टीकरण दिलं आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. उच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार 100 कोटी वसुलीप्रकरणी चौकशी अद्याप सुरुच असल्याचं सीबीआयने म्हटलं आहे. त्यामुळे आज दिवसभरापासून सुरु असलेल्या चर्चांवर पडदा पडला आहे.
मुख्यमंत्री-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंची भाष्य, काढली राजकीय फुग्यातील हवा
सीबीआयने अनिल देशमुख यांना क्लीनचिट दिली आहे. त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले, असा दावा अहवालाच्या आधारावर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात चर्चेला उधाण आले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आता सीबीआयने स्वत: समोर येऊन या अहवालाबाबत खुलासा केला आहे. आमच्याकडून अनिल देशमुख यांना क्लीनचीट देण्यात आलेली नाही. याप्रकरणी उद्याप चौकशी सुरु आहे. शिवाय पुराव्याच्या आधारावरच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं ते सीबीआयने म्हटलंय.
तहसीलदार देवरे प्रकरणाला राजकीय गालबोट; चित्रा वाघ सुपारी घेवून काम करतात?
हायकोर्टाने 100 कोटींच्या वसुलीप्रकरणी सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सीबीआयने तपास सुरु केला आणि 23 एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महत्त्वाचे पुरावे मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सीबीआयने म्हटलं होतं. याचा पुनरुच्चार सीबीआयने आज पुन्हा एकदा केला. याप्रकरणात कोणालाही क्लीनचिट देण्यात आलेली नाही. पुराव्याच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवाय याप्रकरणाची केस बंद करत असल्याचा कोणताही अहवाल सादर करण्यात आलेला नाही, असं सीबीआयने म्हटलं.
Read Also :
- तब्बल 20 वर्षानंतर गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंच्या घरी गेले; काय होत नेमकं कारण? वाचा सविस्तर…
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार
- दरोडेखोर परमवीर सिंग यांना तात्काळ अटक करणं गरजेचं आहे; हसन मुश्रीफांचा आक्रमक पवित्रा
- सत्तेसाठी हपापलेल्या भाजपाला मनःशांती लाभो आणि राज्याला बदनाम न करण्याची सद्बुद्धी मिळो – रोहित पवार
- अजित पवार पुर्णपणे अज्ञानी आहेत, फक्त स्वत: वरील गुन्हे हटवण्यापुर्ते हुशार होतात – नारायण राणे