जालना : जालन्यात मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असतांना पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जविरोधात आज संपुर्ण महाराष्ट्र तापलं आहे. या घटनेत जवळपास ४५ पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेचे पडसाद उमटताच राज्यातील नेत्यांकडून संतापाची लाट उसळली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यावरून आता मनसेचे नेते वसंत मोरे यांनी राज्य सरकारला कडक इशारा दिलाय.
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत 3 ठराव संमत , १३ सदस्यांची समिती स्थापन
पुणे शहाराचे मनसेचे माजी अध्यक्ष वसंत मोरे यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात एक महिला आणि एक पुरूष मराठा आंदोलनादरम्यान जखमी झाल्याचे फोटो ट्विट केलं आहे. त्यावर सरकारने एक गोष्ट नीट ध्यानात ठेवावी. हे मराठे आहेत. जे पण द्याल ना ते येणाऱ्या लोकसभा, विधानसभेत व्याजासह परतफेड करणार. घोडा मैदान जवळ आहे, लावा ताकद असं म्हणत राज्य सराकराला इशारा दिलाय.
हेही वाचा…इंडियाच्या संयोजक समितीत राज्यातून शरद पवार, संजय राऊतांचा समावेश, एकून १३ जणांची समिती
दरम्यान, मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी जालन्यात पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी गोंदी पोलीस ठाण्यात जवळपास २०० हुन अधिक अज्ञातांविरूद्ध भादंवि कलम ३२३, ३५३, ३३३२,१४७ आणि १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कालच्या घटनेत एकूण ४५ पोलीस जखमी झाले असून त्यात १७ महिला पोलिस आहेत. त्यावेळी मराठा आरक्षण आंदोलनात किती लोक जखमी झाले आहेत. याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाहीय.
सरकारने एक गोष्ट नीट ध्यानात ठेवावी. हे मराठे आहेत. जे पण द्याल ना ते येणाऱ्या लोकसभा, विधानसभेत व्याजासह परतफेड करणार. घोडा मैदान जवळ आहे, लावा ताकद …#जालना pic.twitter.com/kzwqgHBDFt
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) September 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…जालना लाठीचार्ज प्रकरण..! 200 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल, ४५ पोलीस जखमी, संपुर्ण राज्यात संताप
हेही वाचा…“फडणवीस क्रूरतेच्याबाबतीच मोदी आणि शहांनाही मागे टाकताहेत, अगोदर ‘वारकरी’ अन् आता ‘मराठा बांधव’”
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन चिरडलं”, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा आरक्षणासाठी बसलेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाढीचार्ज