जालना : जालन्याच्या अतंरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चांच उपोषण सुरू होतं. यामध्ये मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरू असतांना प्रकृती बिघडली. त्यानंतर पोलिसांना आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु मोर्चेकरी मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाढीचार्ज केले. उपोषण रोखण्याच्या प्रयत्नावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यानंतर आता संपुर्ण राज्यातून संतापाची लाट उसळली आहे.
हेही वाचा…“पक्षांनी उमेदवारी दिली तर १०० टक्के मोदींचा पराभव करणार”, पुण्याच्या ‘या’ आमदारानी दिलं थेट मोदींना चॅंलेज
मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर अमानुष पद्धतीने लाठीमार झाला आहे. देवेंद्र फडणवीस क्रूरतेच्या बाबतीच मोदी आणि शहांनाही मागे टाकत आहेत. वारकरी बांधव, मराठा आंदोलक अशा सर्वांनाच केवळ बळाचा वापर करून मारहाण करण्यात आली. या जखमा बऱ्या झाल्या तर खुणा कायम राहतील. असा आरोप राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केलाय.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणुकीच्या रिगंणात”, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,”त्यांच्या नावावर..,”
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी भाजपाला इतकी झोंबते की अशा अमानुषपणे पोलिसांकडून झोडपावे? असा सवाल काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपला केलाय. इतका पराकोटीचा मराठाद्वेष? म्हणूनच मराठा आरक्षण विरोधात न्यायालयात संघाच्या जवळच्या संस्था पाठवल्या होत्या. भाजपा सरकारने ही क्रिया केली आहे, प्रतिक्रिया निवडणुकीत येणारच..असंही त्यांनी म्हटलंय.
मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर अमानुष पद्धतीने लाठीमार झाला आहे. देवेंद्र फडणवीस क्रूरतेच्या बाबतीत मोदी आणि शहांनाही मागे टाकत आहेत. वारकरी बांधव, मराठा आंदोलक अशा सर्वांनाच केवळ बळाचा वापर करून मारहाण करण्यात आली. या जखमा बऱ्या झाल्या तर खुणा कायम राहतील.
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) September 1, 2023
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी भाजपाला इतकी झोंबते की अशा अमानुषपणे पोलिसांकडून झोडपावे? इतका पराकोटीचा मराठाद्वेष? म्हणूनच मराठा आरक्षण विरोधात न्यायालयात संघाच्या जवळच्या संस्था पाठवल्या होत्या. भाजपा सरकारने ही क्रिया केली आहे, प्रतिक्रिया निवडणुकीत येणारच.. जाहीर निषेध! pic.twitter.com/MNAgFlpXTs
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन चिरडलं”, राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा आरक्षणासाठी बसलेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाढीचार्ज
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत 3 ठराव संमत , १३ सदस्यांची समिती स्थापन
हेही वाचा…इंडियाच्या संयोजक समितीत राज्यातून शरद पवार, संजय राऊतांचा समावेश, एकून १३ जणांची समिती