जालना : जालन्याच्या अतंरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश मोर्चांच उपोषण सुरू होतं. यामध्ये मराठा आक्रोश मोर्चाचे मनोज जरांगे पाटील यांची उपोषण सुरू असतांना प्रकृती बिघडली. त्यानंतर पोलिसांना आंदोलन थांबवण्याचे प्रयत्न सुरू झाले. परंतु मोर्चेकरी मानायला तयार नसल्याने पोलिसांनी लाढीचार्ज केले. उपोषण रोखण्याच्या प्रयत्नावेळी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये धुमश्चक्री झाली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी जरांगे पाटलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणुकीच्या रिगंणात”, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,”त्यांच्या नावावर..,”
मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज झालेल्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना आताच भेटी दिल्या. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. या ठिकाणी नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या भागातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे जाणवले. पोलिसांनी लाठीचार्ज करताना महिला आहेत का पुरुष आहेत ते बघितले नाही,वयोवृध्द नागरिकांना व लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली. उपचार करणाऱ्या डॉक्टरला देखील मारहाण करण्यात आली. असं रोहित पवारांनी म्हटलंय.
“जरांगे पाटलांची तब्येत बिघडली अन्…,” जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज
दरम्यान, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छऱ्यांचा वापर करण्यात आला. छरे लागलेल्या युवकांच्या जखमा बघून आपल्याच नागरिकांवर अशाप्रकारे छरयांचा वापर करता येतो का हा प्रश्न पडतो. पुढच्या आठवड्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी कुठलाही व्यत्यय नको म्हणून आंदोलन अमानुषपणे चिरडले असल्याची तसेच वरिष्ठांच्या आदेशानेच पोलिसांनी एवढी टोकाची भूमिका घेतल्याची भावना अनेक युवकांनी व्यक्त केली. या सर्व युवकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शासनाने देखील घटनेकडे गांभीर्याने बघायला हवे.
#मराठा आंदोलकांवर अमानुषपणे लाठीचार्ज झालेल्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर, वडिगोद्री या गावांना आताच भेटी दिल्या. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.या ठिकाणी नागरिकांशी, सामजिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली असता या भागातील…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
हेही वाचा…मोठी बातमी…! मराठा आरक्षणासाठी बसलेले आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाढीचार्ज
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीत 3 ठराव संमत , १३ सदस्यांची समिती स्थापन
हेही वाचा…इंडियाच्या संयोजक समितीत राज्यातून शरद पवार, संजय राऊतांचा समावेश, एकून १३ जणांची समिती
हेही वाचा…“पक्षांनी उमेदवारी दिली तर १०० टक्के मोदींचा पराभव करणार”, पुण्याच्या ‘या’ आमदारानी दिलं थेट मोदींना चॅंलेज