पुणे : आगामी २०२४ च्या लोकसभेची निवडणुक पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लढवणार असल्याची चर्चा सध्या सुरूय. मोदींनी पुण्यातून निवडणुक लढविल्यास याचा फायदा महाराष्ट्राला होऊ शकतो. अन् राज्यातील ४८ पैकी ४८ जाग निवडून येऊ शकतात. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून आता पुण्यातील काॅंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मोदींना चॅलेंज दिलं आहे.
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या लोगाचं अनावरण पुढं ढकललं, कारण आलं समोर, तर भाजपची जोरदार टिका
रविंद्र धंगेकरांनी म्हटलं की, गेल्या ९ वर्षापासून देशातील राजकारण लोकशाहीला फाटा देऊन हूकूमशाहीकडे वाटचाल सुरूय, त्या राजकारणाला भारतीय जनता त्रस्त झालीय. मागच्या काही वर्षापासून बेरोजगारी, महागाई आणि इतर समस्यांनी नागरिक वैतागून गेलीय आणि देशात भांडवलशाहीचं राजकारण सुरूय. अनेक जण आपल्या देशातून पैसा घेऊन पळून गेले आहेत. या सर्व कारणांना मोदी सरकार कारणीभूत आहे.
हेही वाचा…२०२४ लोकसभेची निवडणुक नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार, काॅंग्रेसचा ‘हा’ बडा नेता मोदीविरूद्ध लढणार, राज्यात एकच चर्चा
पुण्यात मोदीविरूद्ध काॅंग्रेस ज्या नेत्यांची निवड करेल, त्याच्या पाठीशी उभं राहून त्यांना जिंकण्यासाठी पुर्ण ताकद लावू. माझ्यासोबत अनेक जण निवडणुकीची वाट पाहत आहेत. अन् त्यातून जर उमेदवारी दिली तर शंभर टक्के मोदींचा पराभव करणार, असंही रवींद्र धंगेकरांनी सांगितलंय. पुणे शहरात गेली ३० वर्ष काम करीत आहे. प्रत्येक मतदारसंघात माझे वैयक्तिक संबंध असून त्यामुळे मला उमेदवारी दिली तर लोक शंभर टक्के मला निवडून देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून निवडणुकीच्या रिगंणात”, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,”त्यांच्या नावावर..,”
हेही वाचा…“आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीचा खर्च कुणी केला? त्याचा हिशोब कोण देणार ?” सुषमा अंधारेंचा सवाल हेही वाचा…
हेही वाचा…‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकाला महाविकास आघाडीचा विरोध, तर अजित पवार गटाने मांडली आपली भूमिका
हेही वाचा…धक्कादायक…! भाजपच्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांच्या घरात तरूणांची हत्या, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…“निलेश राणे आणि नितेश राणे यांच्यावर संस्कार नावाचं व्हिटॅमिन कमी पडलं”, सुषमा अंधारेंची जहरी टिका