मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीत आज लोगोचं अनावरण केलं जाणार होतं, परंतु आजच्या बैठकीत लोगोचं अनावरण केलं जाणार नसल्याची माहीती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इंडिया लोगोत सर्व पक्षीय नेत्याचं एकमत नसल्याचं कारण सांगत लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आलं आहे. तसेच इंडिया आघाडीची पुढची बैठक तमिळानाडूत होणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
इंडिया आघाडीच्या बैठकीत आज लोगोचं अनावरण केलं जाणार नाही, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आधी समन्वयक, संयोजक पदावर चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर पुढील रणनीती आखली जाईल. असंही त्यांनी म्हटलंय. यावर आता भाजपने टिका केली आहे.
हेही वाचा…मोदींनी विरोधकांवर मोठा डाव टाकला, संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांना जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत
दरम्यान, भाजप विरुद्ध दंड थोपटून उभी असलेली घमेंडीया टोळी म्हणजे मोठं घर पोकळ वासा असल्यासारखं आहे. या सगळ्यांना राष्ट्र, राष्ट्रप्रेम, लोककल्याण याच्याशी काहीही घेणंदेणं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. यांच्यामध्ये असलेली घमेंड परत एकदा दिसून आली. या लोकांमध्ये इंडियाच्या लोगोवरून वाद निर्माण झाला आणि आज त्यांच्या लोगोचा अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला. असंही भाजपने म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…२०२४ लोकसभेची निवडणुक नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार, काॅंग्रेसचा ‘हा’ बडा नेता मोदीविरूद्ध लढणार, राज्यात एकच चर्चा
हेही वाचा…एक देश, एक निवडणुक..! मोदी सरकारचा विरोधकांना दे धक्का, रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती
हेही वाचा…“फडणवीसांची दुकानदारी बंद होण्याची वेळ आलीय, फडणवीसांनी भाजपाला अडचणीत आणलंय,”
हेही वाचा…इंडिया आघाडीच्या नाकावर टिचून महायुतीचीही मुंबईत बैठक, दोन महत्वाचे ठराव मंजूर
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल