मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता देशात बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. मुंबईत इंडियाची बैठक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीचीही बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी महायुतीतील अनेक घटक पक्ष देखील या बैठकीसाठी उपस्थित होते. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या मुंबईत केंद्रीत झाल्याचं दिसून येत आहे.
हेही वाचा…“मुंबईतून पळून गेलेल्यांनी इतरांचा खर्च काढू नये”, वडेट्टीवारांचा उदय सामांतांवर जोरदार पलटवार
मुंबईतील महायुतीच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीला एकत्रिपणे सामोरे जाऊन राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याचा ठराव संमत करण्यात आला. याशिवाय चंद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेबद्दल इस्रोतील सर्व शास्ज्ञांच्या अभिनंदनाचा ठरावही मंजूर करण्यात आला. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
हेही वाचा…८३ वर्षाचा योद्धा मैदानात, शरद पवारांनी आखली परराज्यातही मोठी रणनीती
दरम्यान, तसेच गेली ९ वर्षे देशाची अविरत सेवा करून देशात सुशासन आणि भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल, तसेच देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. राज्यात महायुती सरकारने केलेली विकासकामे आणि घेतलेले लोकाभिमुख निर्णय थेट लोकांपर्यंत पोहचवून पुन्हा एकदा केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सत्ता आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
#राष्ट्रीय_लोकशाही_आघाडी ची बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह #महायुती तील #शिवसेना, #भारतीय_जनता_पार्टी आणि #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी आणि मित्रपक्षांचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.
या बैठकीत आगामी लोकसभा… pic.twitter.com/VFTGzwYGwk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 1, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पराभाव दिसल्यानं भाजपकडून पर्यांयाचा वापर”, केंद्र सरकारच्या त्या विधेयकावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल
हेही वाचा…“अनेक चेहरे कोणाला असतात, तिकडे रावण अन् इकडे..,”मुख्यमंत्र्यांचं ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…मोदींनी विरोधकांवर मोठा डाव टाकला, संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांना जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत
हेही वाचा…“इंडिया दिवसेंदिवस मजबुत होतेय, येणाऱ्या काळात अनेक साक्षात्कार होतील”
हेही वाचा…राहुल गांधींचा मुंबईत अदानींवरून मोदींवर हल्लाबोल, भ्रष्टाचाराचा आरोप करत साधला निशाणा