मुंबई : अजित पवारांनी सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी दोन्ही गटातील नेत्यांनी कंबर कसली आहे. यासाठी आता पक्षात नियुक्त्या, नेमणुका आणि पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहे. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हरियाणा आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढविणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…इंडियाच्या नेत्यांना बसण्यासाठी ४५ हजारांची खूर्ची, ६५ खोल्या बुक, कोट्यावधीचा खर्च, सगळे पक्ष बेरोजगार होणार
मुंबईत आज इंडियाची ग्रॅंड हयात याठिकाणी महत्वाची बैठक होत आहेत. यासाठी विविध राज्यातून अनेक नेते मुंबईत दाखल झाले आहेत. यातच आता शरद पवार हरियाणा आणि राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढण्याच्या विचारात आहेत. यासाठी आता दोन दिवस हरियाणा आणि राजस्थानमधील नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
दरम्यान, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अलिकडेच शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर येथील मध्यवर्ती समिती सदस्य ऍड. बाळासाहेब संपतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तर शिवाजी चंद्रकांत खांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ‘सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आलीय. तर ऍड. संजय संपतराव काळबांडे यांची इतर मागासवर्गीय (ओ. बी. सी.) सेलच्या ‘महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवारांनी बारामतीकडे मोर्चा वळवला, सुप्रिया सुळेंना धक्का देण्याच्या तयारीत ?
हेही वाचा…“2024 नंतर इंडियातील सर्व पक्ष बेरोजगार होणार”, बड्या नेत्यांनी विरोधकांना डिवचलं
हेही वाचा…“फडणवीस सरकारचा कणा केंद्र सरकारपुढे वाकला, अन् आता मिंधे सरकारचा कणा मोडून पडला”
हेही वाचा…विविध नेत्यांच्या नियुक्त्या तर अनेकांचा पक्षप्रवेश..! शरद पवार गटात मोठ्या राजकीय हालचाली सुरूय
हेही वाचा…“भित्रट नसाल तर लावा निवडणुका”, ठाकरेंच्या वाघांनी भाजपला दिलं ओपन चॅलेंज