मुंबई : अजित पवारांनी महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले. आता राष्ट्रवादीच्या अजित पवार आणि शरद पवार गटाने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी तयारी सुरू केलीय. यातच आता शरद पवार गटाने मोठ्या हालचाली सुरू केल्या असून अनेक नेत्यांच्या नियुक्त्या आता शरद पवार गटात केल्या जात आहेत.
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अलिकडेच शेतकरी कामगार पक्षाचे सोलापूर येथील मध्यवर्ती समिती सदस्य ऍड. बाळासाहेब संपतराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. तर शिवाजी चंद्रकांत खांडेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ‘सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आलीय. तर ऍड. संजय संपतराव काळबांडे यांची इतर मागासवर्गीय (ओ. बी. सी.) सेलच्या ‘महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा…झुनका भाकर, पुरणपोळी, वडापाव अन् बरच काही., इंडियाच्या बैठकीसाठी खास मेन्यू, महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने राजेंद्रन (उर्फ) राजन नायर यांची पक्षाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रा. सुशीलाताई मोराळे यांचीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ‘सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आलीय. तर बीडमधील बबन गिते यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आलीय.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने श्री. राजेंद्रन (उर्फ) राजन नायर यांची पक्षाच्या ‘महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, माननीय आमदार जितेंद्र… pic.twitter.com/k14ok2orKR
— NCP (@NCPspeaks) August 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“भित्रट नसाल तर लावा निवडणुका”, ठाकरेंच्या वाघांनी भाजपला दिलं ओपन चॅलेंज
हेही वाचा…इंडियाच्या नेत्यांना बसण्यासाठी ४५ हजारांची खूर्ची, ६५ खोल्या बुक, कोट्यावधीचा खर्च, सगळे पक्ष बेरोजगार होणार
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप