मुंबई : इंडिया दिवसेंदिवस मजबुत होत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. महागाई , बेरोजगारी, सद्याची दुष्काळजन्य परिस्थिती यासारखे जनतेचे मूळ मुद्दे आता चर्चेत येत असल्याने लोकांना भाजपा सरकारचा खरा चेहरा कळायला सुरवात झाली आहे. परिणामी गेली दहा वर्षे जनतेला गृहीत धरून चालणाऱ्या केंद्र सरकारला सिलिंडरच्या किमती कमी करण्याचा साक्षात्कार झाला. येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करणे यासारखे अजून खूप सारे साक्षात्कार होतील, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी भाजपला लगावला आहे.
हेही वाचा…“विश्वगुरू अन् भाजप-आरएसएसच्या गुंडांनी प्रश्नांची उत्तरं द्या,” प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर संताप
पुढे बोलतांना ते म्हणाले की, निवडणुकांना जेवढा उशीर होईल ,पराभव देखील तेवढाच मोठा होईल हे भाजपला कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांना सरकारचा खरा चेहरा समजण्यासाठी व इंडिया अधिक मजबूत होण्यासाठी अधिकचा वेळ मिळू नये, यासाठी भाजपा प्रयत्नशील असून लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कदाचित त्यामुळेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची गरज पडली असेल ,हे नाकारता येणार नाही. असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…“राज्यातील महसुल अधिकारीच सुरक्षित नाहीत? ऑफिसमधील छत कोसळलं,” वडेट्टीवारांचा सरकारवर संताप
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने येत्या १8 सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान, संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आता या अधिवेशनात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
#INDIA दिवसेंदिवस मजबुत होत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.#महागाई , #बेरोजगारी,सद्याची #दुष्काळजन्य परिस्थिती यासारखे जनतेचे मूळ मुद्दे आता चर्चेत येत असल्याने लोकांना #भाजपा सरकारचा खरा चेहरा कळायला सुरवात झाली आहे.
परिणामी , गेली दहा वर्षे जनतेला गृहीत धरून…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 31, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राहुल गांधींचा मुंबईत अदानींवरून मोदींवर हल्लाबोल, भ्रष्टाचाराचा आरोप करत साधला निशाणा
हेही वाचा…“मुंबईतून पळून गेलेल्यांनी इतरांचा खर्च काढू नये”, वडेट्टीवारांचा उदय सामांतांवर जोरदार पलटवार
हेही वाचा…८३ वर्षाचा योद्धा मैदानात, शरद पवारांनी आखली परराज्यातही मोठी रणनीती
हेही वाचा…“विकासाच्या नावाखाली केंद्राची वक्र नजर राजधानी मुंबईवर वळली”, राष्ट्रवादीची भाजपवर जहरी टिका
हेही वाचा…शरद पवारांचा खंदा समर्थकानी घेतली मोठी भूमिका, निवडणुकीपुर्वी कोणत्या गटात जाणार ?