मुंबईत : इंडियाची मुंबईत आज आणि उद्या महत्वाची बैठक होत असून याची जबाबदारी महाविकास आघाडीकडे देण्यात आली आहे. या बैठकीसाठी देशातील प्रमुख २८ पक्षांचे नेते मुंबईत येणार असून त्यांचं स्वागत तसेच संपुर्ण कार्यक्रम महाराष्ट्रीय पद्धतीने होणार आहे. या संपुर्ण नेत्यांच्या रात्रीच्या जेवणासाठी मराठमोळे खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात येणार आहे.
हेही वाचा…पंतप्रधानपदाची इंडियाकडे अनेक पर्याय, पण भाजपात मोदींशिवाय पर्याय आहेत का ?
इंडियाच्या आघाडीची बैठक मुंबईतील ग्रॅंड हयात हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. याबैठकीसाठी देशभरातील महत्वाचे नेते तसेच मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नेत्यांसाठी आज संध्याकाळी रात्रभोजनाचं आयोजन केलं आहे. या नेत्यांसाठी नाश्ताला बाकरवडी, नारळी वडी, नाचणीचे वेफर्स तसेच वडापाव ठेवण्यात आलाय. तसेच चहा काॅफींसह नारळपाणी, लिंबूपाणी तसेच फळांचा रसही ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा…“इंडियाची बैठक झाली अन् गॅसच्या किमंती कमी झाल्या, कारण केंद्र सरकारचं गॅसवर,” ठाकरेंचा हल्लाबोल
झुणका आणि मोदक तसेच पाहुण्यांसाठी स्वीट डिशमध्ये नारळाची करंजी, दुधी मावा आणि मोदकाचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय पाहुण्यांना गरमागरम पुरणपोळीचा अस्वादही चाखता येणार आहेत. या पाहुण्यांसाठी झुणका भाकरही ठेवण्यात आली आहे. तसेच श्रीखंड पुरी, भरलेल्या वांग्यासहीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेलही यावेळी असणार आहे.
हेही वाचा…2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरूद्ध अरविंद केजरीवाल, इंडियाच्या बैठकीपुर्वी आपची मोठी घोषणा
दरम्यान, यावरून मनसेने टिका केलीय. राज्यात ३ आठवड्यांपासून पाऊस गडप झालाय. बळीराजाची चिंता वाढलेली आहे. दुष्काळाचं संकट गहिरं होतंय. मविआ नेते एकीकडे राज्यात दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करतायत आणि दुसरीकडे I.N.D.I.Aआघाडी बैठकीआधी राज्याच्या राजधानीत पुरणपोळी, करंजी, मोदक अशा पंचपक्वान्नाच्या पंगती उठतायत. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळताना या नेत्यांना लाजही वाटत नाही. सत्तापिपासू नेत्यांच्या या भाऊगर्दीत जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एकच पक्ष आहे आणि मी अशा मनसे पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे याचा मला अभिमान आहे. असं मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत टिका केलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्ता नहीं, पार्टी नहीं, तभी उद्धव ठाकरे का इतना डर”, दानवेंनी भाजपला डिवचलं
हेही वाचा…स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय पुन्हा लांबणीवर, कोर्टाकडून ‘ही’ नवीन तारिख जाहीर
हेही वाचा…“देव आमचा जुगार खेळतो, भारतरत्न परत करा” , तेंडूलकराच्या घरासमोर बच्चू कडूंचं जोरदार आंदोलन
हेही वाचा…“अजित दादांच्या दादागिरीला ठाण्याच्या भाईंचा लगाम..!” वडेट्टीवारांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…“बंडखोरांना आगामी निवडणुकीत जागा दाखवली जाईल,” शरद पवारांनी अजित पवार गटाविरूद्ध दंड थोपटलं