मुंबई : महाविकास आघाडीवर सातत्याने टीका केल्यामुळे मागील काही दिवसात अभिनेत्री कंगना राणावत चर्चेत आहे. कंगना विरुद्ध शिवसेना असाच सामना गेली अनेक दिवस संपुर्ण महाराष्ट्राने पाहिला. या वादात कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयावर देखील बीएमसीकडून कारवाई करण्यात आली होती. आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी कंगनाचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, याआधारे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सचिन सांवत यांनी ट्विटरवर कंगनाचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. यात कंगना आपल्या चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळातील माहिती देत आहे. तसेच आपण ड्रग्स घेत असल्याचे देखील सांगत आहे. या व्हिडीओवरून कंगनावर कारवाई करावी, अशी मागणी सचिन सांवत यांनी एनसीबीकडे केली आहे.
Dear NCB, She is bk!
When will you call @KanganaTeam for this video? Also Modi govt gave Y category security to her ( she is still enjoying at the cost of exchequer) as she wanted to give info abt drug racket in bollywood. She is still hiding info abt crime which is an offense pic.twitter.com/z5PWUWE8BA— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 30, 2020
सचिन सांवत यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले की, एनसीबी, या व्हिडीओबाबत तुम्ही कंगनाला कधी बोलणार आहात ? असं असूनही मोदी सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. ती बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटसंबंधी माहिती देणार होती. मात्र, ती माहिती लपवत आहे. असे करणे गुन्हा आहे.
दरम्यान, शिवसेनेवर सातत्याने निशाणा साधणाऱ्या कंगनाला आता शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी देखील आता निशाण्यावर घेतले आहे. बाईच्या डोक्यावर अपघात झाला की काय? अशा शब्दात मातोंडकर यांनी कंगनाला टोला लगावला आहे.