नवी दिल्ली : ‘काश्मीर लोक स्वत:ला भारतीय मानत नाही, ना त्यांना भारतीय व्हायचं आहे. भारताऐवजी चीनने त्यांच्यावर शासन करावं; असं वादग्रस्त विधान लोकसभा खासदार फारुक अब्दुल्ला यांनी केले आहे. यावरुन आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एका मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केले आहे ‘काश्मिरी लोकांना मोदी सरकारवर विश्वास राहिला नाही अशी लोकांची मानसिकता आहे. फाळणीच्या वेळी खोऱ्यातील लोकांना पाकिस्तानमध्ये जाणे सोपे होते, परंतु त्यांनी गांधींजींचा भारत निवडला होता मोदींचा भारत नाही. आज चीन दुसर्या बाजूने पुढे सरकत आहे. जर आपण काश्मिरींशी चर्चा केली तर बरेच लोक चीनने भारतात यावं असं म्हणतायेत. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक असूनही ते असं म्हणत आहेत, मी यावर फारसा गंभीर नाही परंतु मी प्रामाणिकपणे सांगतोय ते लोक ऐकायला तयार नाहीत असं फारुक अब्दुला म्हणाले.
‘तुम्ही जर काश्मिरींशी चर्चा केली तर अनेकांना चीनने भारतात यावं असं वाटत आहे. आपण तेथे जा आणि कोणाशीही बोला. ते स्वत: ला हिंदुस्तानी किंवा पाकिस्तानी मानत नाहीत. चीनने त्यांच्यावर राज्य करावे अशी त्यांची इच्छा आहे. चीनने मुस्लिमांचे काय केले हे त्यांना ठाऊक आहे, मागील वर्षी ५ ऑगस्टला मोदी सरकारने जे केलं त्याचे शेवटचं केला असं त्यांनी सांगितले.
Read Also
मराठा समाजावर आंदोलन करण्याची वेळ सरकारने येऊ देऊ नये अन्यथा ….https://t.co/RK5P8mGCER
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 24, 2020