मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत.
सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांची भूमिका असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार रवी राणा यांनी देखील अडसूळ यांच्यावर अशाच स्वरूपाचे आरोप केले होते.
मी ED आणि RBI ला विनंती केली आहे
शिवसेना नेता श्री आनंद अडसूळ व परिवराचा
१. एचडीआयएलकडून HDIL ₹१ कोटी किकबॅक / देणगी (पीएमसी बँक चा पैसा)
२. सिटी City सहकारी बँकेच्या घोटाळ्यात त्यांची भूमिका
तपास करावा@BJP4Maharashtra@BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/sVuxvFMDeX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 16, 2021
सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या कुटुंबाची भूमिका तपासावी. तसेच एचडीआयएल या बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून त्यांनी 1 कोटी रुपयांची देणगी स्वीकारल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ईडी आणि आरबीआयला या सर्व गोष्टींचा तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला होता.
Read Also :
- ‘कोणी काही करू शकणार नाही, अशा भ्रमात राहू नका’, अण्णा हजारेंचा मोदी सरकारला इशारा
- काँग्रेस आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात
- आजपासून लसीकरणाला सुरुवात, महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ‘इतक्या’ जणांना मिळणार लस
- … म्हणून पहिली लस मोदींनी टोचून घ्यावी, राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याची मागणी
- ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान