यवतमाळ : काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यवतमाळहून नागपूरकडे येत असताना हा अपघात झाला असून, अपघातात ते थोडक्यात बचावले.
वजाहत मिर्झा हे यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देखील आहेत. शुक्रवारी 9.30 वाजताच्या सुमारास यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री अपघात झाला, त्यात त्यांच्या आईला किरकोळ दुखापत झाली.
‘चाचा का ढाबा’ जवळ त्यांच्या गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिली. कारच्या चालकाने मद्य प्राशन केले होते, असे सांगितले जाते. या अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, डॉ. वजाहत मिर्झा हे 2018 साली काँग्रेसकडून विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून आले होते.
Read Also :
- आजपासून लसीकरणाला सुरुवात, महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ‘इतक्या’ जणांना मिळणार लस
- … म्हणून पहिली लस मोदींनी टोचून घ्यावी, राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याची मागणी
- ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी 79 टक्के मतदान
- शेतकरी रस्त्यावर उतरणार, 23 जानेवारीपासून महाराष्ट्रात आंदोलन
- ‘… म्हणून मी एवढे दिवस गप्प होते’, मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेने सांगितले कारण