पुणे : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज (दि. १८) लहु बालवाडकर सोशल वेलफेअरच्या वतीने बालेवाडी भागात सुरु करण्यात आलेल्या “फर्स्ट एड पॉलिक्लिनिक” ला सदिच्छा भेट दिली. नागरिकांना अल्प दरात आरोग्य सेवा देण्याच्या हेतूने चालू केलेल्या या आरोग्य केंद्राबद्दल डॉ. भारती पवार यांनी सोशल फेअर’चे संस्थापक लहु बालवडकर यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली व या उपक्रमाचे कौतुक केले.
पिंपरी चिंचवडच्या लोकांनी मला सहा वेळा निवडून दिले; निवडणुकीच्या रणांगणात पवारांचा पहिला डाव
या पॉलिक्लिनिक बद्दल बोलताना डॉ. भारती पवार म्हणाल्या की, मी केंद्र सरकार मधे सांभाळत असलेल्या आमच्या आरोग्य खात्यासंदर्भात लहु बालवडकर करत असेल काम नक्कीच स्तुत्य आणि प्रशंसनीय आहे व यामुळे आमच्या विभागाला नक्कीच मदत होत आहे. तळागाळातील सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. भविष्यकाळात देखील असेच आरोग्याविषयक उपक्रम आपल्या लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून राबविले जावेत जेणेकरून कोणीही या आरोग्यसेवेपासून वंचित राहणार नाही. दरम्यान, त्यांना बालवडकरांच्या दवाखानाचा उपक्रमांची माहिती यांना आधी पासुनच होती ते पाहण्यासाठी त्या आवर्जुन बालेवाडी येथे आल्याचे सांगितले.
बालेवाडी येथील फर्स्ट एड पॉलिक्लिनिक’च्या या सदिच्छा भेटीच्या वेळी लहु बालवडकर सोशल वेलफेअरचे अध्यक्ष लहु बालवडकर, नगरसेविका ज्योतीताई कळमकर, गणेशदादा कळमकर, प्रभाग क्र. 9 च्या भाजपा महिला आघाडी च्या अध्यक्षा उमाताई गाडगीळ, उपाध्यक्षा नैनाताई पोळ, आय.टी सेल च्या अध्यक्षा उज्वलाताई साबळे, रिना सोमय्या, राखी श्रीवास्त शिवानी अग्रवाल, सिमरन पुला, शिवम सुतार, सचिन दळवी, शिवम बालवडकर व इतर पदाधिकारी मित्र परिवार उपस्थित होते.
Read Also :
- तीन हजार रोख, मटण-मासे पार्टी, पत्ते खेळायला पैसै! शिवसेना आमदाराने उलगडलं निवडणुकीचं गणित
- गेल्या पंधरा वर्षात राष्ट्रवादीने जेवढा विकास केला नाही, त्यापेक्षा जास्त आम्ही दोघांनी करून दाखवला
- भाजपला पडली मोठी खिंडार; येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
- आणखी एका मंत्र्याच्या पापाचा घडा भरला; भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा रोख कुणाकडे?
- सत्ता कोणाचीही असो, अंगावर घेण्याची ताकद फक्त आमच्यातच – निलेश राणे