मुंबई : ड्रग्जमाफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई येथे अटक करून त्याला आज अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. अंधेरी कोर्टात ललित पाटील याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर ललित पाटील याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
हेही वाचा…“ललित पाटीलचा जयसिंघानी होऊ नये, ‘या’ मोठ्या नेत्यांनी व्यक्त केली भिती”, प्रकरणात मोठ्या मंत्र्यांचा संबंध?
अंधेरी कोर्टात हजर करण्यासाठी नेत असताना ललित पाटलानी मोठा गौफ्यस्फोट केला आहे. मला ससून रूग्णालयातून पळवलं गेलं आहे. यामध्ये अनेकांचा हात असून हे सर्व बाहेर काढणार आहे. तसेच याबाबत लवकरच पत्रकारांशी बोलणार असल्याचंही ललित पाटील याने सांगितले आहे.
हेही वाचा…काकांचा सल्ला ऐकला…! ४० वर्षांपासूनचा राष्ट्रवादीचा निष्ठावंत माजी आमदार परतला
ललित पाटीलला कोर्टात या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आले. परंतु आपल्यावरील सर्व आरोप खोटे आहेत. अस ललित पाटीलने कोर्टात सांगितले. त्यानंतर अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली असता कोर्टाने ललित पाटीलला सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे.
हेही वाचा…काकांचा सल्ला ऐकला…! ४० वर्षांपासूनचा राष्ट्रवादीचा निष्ठावंत माजी आमदार परतला
दरम्यान, ललित पाटीलला अटक केल्यानंतर मुंबईतील पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. ड्रग्ज प्रकरणाचा योग्य तपास केला जात असून ससून रूग्णालयातून ललित पाटील याने कशा पद्धतीने पलायन केले. याची देखील चौकशी केली जात आहे. या सर्व प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचंही मुंबई पोलिसांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांचाही संबंध ? दादा भुसेंनंतर सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
हेही वाचा…“ललित पाटीलला भरचौकात फाशी द्या,” कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी केली मागणी
हेही वाचा…जरांगेंच्या अल्टिमेटला सहा दिवस बाकी, उपसमितीच्या बैठकीत मराठा समाजासाठी घोषणांची बरसात
हेही वाचा…“ससून मधून पळून गेलो नाही, मला पळवलं गेलं, सर्व सांगणार,” अटक केल्यानंतर ललित पाटलाचा व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ पैकी २२ जागांवर शिंदे गटाचा दावा, मग अजित पवार गटाला किती जागा मिळणार ?