मुंबई : शिवसेना अपात्र आमदार प्रकरणावर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानावर बैठक पार पडली. तर आज दुपारी तीन वाजता शिंदे गटातील सर्वच आमदारांना शिवसेना भवनात येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना प्रंचड वेग आला आहे. यातच आता निकालावर प्रसिद्ध वकिल उज्ज्वल निकम यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“सुनील केदारांची आमदारकी त्यात तत्परतेने पुन्हा बहाल करावी, ” विरोधकांची मागणी
आजच्या निकालाचे दुरगामी परिणाम पाहायला मिळतील. लोकशाहीत ज्या कारणासाठी दहावं परिशिष्ट आणण्यात आलं, घोडाबाजार आमदारांची पळवापळवी आणण्यासाठी ते आणलं गेलं. हा उद्देश आज सफल झालाय का ? हा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा निकाल देताना विधिमंडळाचा पुर्ण आदर राखला. लोकशाहीत संकेत असतात की आधारस्तंभांनी एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करू नये. या तत्वाचा आदर राखून सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला असल्याचं उज्जवल निकल यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये २० जण इच्छुक ; आजी माजी आमदार, नगरसेवकांचा समावेश
आजच्या निर्णयातला ऑपरेटिव्ह पार्ट वाचून दाखवला जाईल. पुर्ण निकाल यायला वेळ लागेल. पण आज हे स्पष्ट होईल की कोण जिंकलं आणि कोण हरलं. त्यापेक्षा महत्वाचा भाग म्हणजे दहाव्या परिशिष्टाचा अर्थ अध्यक्ष कसा लावतात. कारण दहाव्या परिशिष्टासाठी देण्यात येणाऱ्या अपात्रतेच्या नोटीसमध्ये कोणती कारणं नमुद करण्यात येत आहेत आणि व्हिपच्या नोटीसमध्ये तसा उल्लेख आहे का ? हेही अध्यक्षांना स्पष्ट करावं लागणार आहे. काही याचिका तांत्रिक कारणामुळेही अध्यक्ष फेटाळू शकतात. असेही निकम यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुंबईत ‘हा’ बडा नेता अजित पवार गटात प्रवेश करणार, पक्षाला बसला मोठा हादरा
हेही वाचा…राहुल नार्वेकरांच्या निकालाआधीच एकनाथ शिंदेंनी जाहीर केला निकाल, म्हणाले…
हेही वाचा…“तर एकनाथ शिंदे अपात्र ठरणार,” राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…अजितदादांनी आखली मोठी रणनिती, अमोल कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार रिंगणात, आढळराव पाटलांचं काय होणार ?
हेही वाचा…“तर राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार,” माजी मुख्यमंत्र्यांनी केला मोठा दावा