पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसने मोठी तयारी सुरू केली आहे. यातच निवडणुक लढवण्यासाठी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील इच्छूकांची यादी मागण्यात आली आहे. महाराष्ट्र काॅंग्रेस कमिटीने इच्छूकांसाठी अर्ज मागविले होते. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण २० जणांनी अर्ज सादर केले आहेत.
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. आता या जागेवर काॅंग्रेसकडून तयारी केली जात असून काॅंग्रेसकडून २० इच्छूकांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये माजी आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे माजी शहाराध्यक्ष, पदाधिकारीसह रेडीओ जॉकीपर्यत अनेकांनी पक्षाकडे अर्ज सादर केले आहेत. त्यात शहाराध्यक्ष अरविंद शिंदे, आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, मोहन जोशी, दिप्ती चौधरी, अनंत गाडगीळ, अॅड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, संगीता तिवारी, माजी नगरसेवक आबा बागूल, विरेंद्र किराड, दत्ता बहिरट नरेंद्र व्यवहारे, यशराज पारखी, मुकेश धिवार, राजू कांबळे, मनोज पवार, दिग्विजय जेधे आणि आर. जे संग्राम खोपडे या २० जणांनी अर्ज सादर केले आहेत.
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका
दरम्यान, पुणे लोकसभा निवडणुक लढवण्याऱ्या २० जणांची यादी काॅंग्रेस हायकमांडला पाठवणार आहे. त्यानंतर ही यादी केंद्रीय कार्यकारिणीस पाठविली जाणार आहे. मात्र. पक्षाकडून या नावांमधील एकाला संधी दिली जाणार की आयत्या वेळी वेगळ्याच नावाला पंसती दिली जाणार ते आगामी काळात जाहीर होईल.
READ ALSO :
हेही वाचा…शरद मोहोळ ह’त्या प्रकरणात मोठी बातमी समोर, मोहोळ ह’त्या प्रकरणात आता गुन्हे शाखेची एंन्ट्री
हेही वाचा…निकालाच्या आधी नार्वेकरांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, राहुल नार्वेकरांनी दिलं भेटीचं कारण, म्हणाले…
हेही वाचा…“काॅंग्रेसचे नेते सुनील केदारांना कोर्टाचा मोठा दिलासा ; ” ‘या’ प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
हेही वाचा…मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून हाणलं
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला