नागपूर : काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नागपूर जिल्हा बॅक घोटाळ्याप्रकरणी सुनील केदार यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुनील केदारांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुनील केदार यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा…मोदींनी लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवावी ; नाशिकच्या साधू महंतांचे नरेंद्र मोदींकडे साकडे
१५० कोटींच्या नागपूर जिल्हा बॅंक घोटाळ्या प्रकरणी सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर त्यांना १२ लाख ५० हजारांचा दंड आणि ५ वर्ष सक्षम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षाविरोधात सुनील केदारांनी उच्च न्यायालयात धाव घेत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यातच आता कोर्टाने एक लाखाच्या जातमुचलक्यावर सुनील केदार यांना कोर्टाने जामीन मंजूर केला असून प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरण..! एकनाथ शिंदेंचे ४० की ठाकरेंचे १४ आमदार ! कुणाचा गेम होणार ?
दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती उर्मिला जोशी यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सुनील केदार यांच्या जमीन अर्जावर दोन्ही पक्षाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुनील केदार यांच्याकडून प्रसिद्ध वकिल सुनील मनोहर यांनी तर राज्य सरकारकडून वकिल राजा ठाकरे यांनी बाजू मांडली. परंतु राज्य सरकारने या जामीन अर्जाला विरोध केला होता. तरी कोर्टाने सुनील केदारांना मोठा दिलासा दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…मनसेच्या दोन्ही गटात मोठा राडा, मनसेच्या कार्यकर्त्यांना पळवून पळवून हाणलं
हेही वाचा…नगर दक्षिण लोकसभेवर राष्ट्रवादीचा दावा, विखे पाटलांनी एका वाक्यात संपवून टाकला
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा