अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता जागावाटपावरून महायुतीत पेच निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी महायुतीत लोकसभा जागेंवरून संघर्ष बघायला मिळत आहे. यातच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके इच्छूक आहेत. त्यांनी या जागेवर दावा देखील सांगितला आहे. त्यावर मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी एका वाक्यात लोकसभेचा प्रश्न संपवून टाकला आहे.
हेही वाचा…“जुलूमशहांचा नि:पात जनता करणारच !” निकालाआधी उद्धव ठाकरेंनी दिली मोठी गर्जना
नगर जिल्हा नियोजन मंडळाच्या पुढील वार्षिक आर्थिक आराखड्याच्या आढाव्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा केली. त्यावर विखे पाटलांनी एका वाक्यात विषय संपवून टाकला.
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरेंचे दोन शिलेदार अडचणीत..! वायकरांच्या नंतर ‘या’ नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड
राणी लंके यांनी लोकसभेवर दावा सांगितल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, स्वंयघोषित उमेदवारांना कोण थांबवणार. महायुतीत आहोत, महायुती जो निर्णय घेईल. तो मान्य करायचा असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं. यातच या लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे सुजय विखे पाटील खासदार आहेत. पुढच्या निवडणुकीच्या दरम्यानही त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु येथून आता अजित पवार गटाने देखील दावा सांगितला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर ४० गद्दार बाद होऊन अपात्र होतील”, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर जोरदार घणाघात
हेही वाचा…“उद्धवसाहेबांच्या शिवसेनेची दहशत भाजपच्या मनात”, ईडी आयटीच्या कारवायांवरून ठाकरे गटाची मोठी टिका
हेही वाचा…चऱ्होलीतील प्रधानमंत्री आवासच्या लाभार्थ्यांचे ‘स्वप्न साकार’, आमदार महेश लांडगे यांचा बैठकीत जागेवर तोडगा
हेही वाचा…मोदींनी लोकसभेची निवडणूक नाशिकमधून लढवावी ; नाशिकच्या साधू महंतांचे नरेंद्र मोदींकडे साकडे
हेही वाचा…शिवसेना अपात्र आमदार प्रकरण..! एकनाथ शिंदेंचे ४० की ठाकरेंचे १४ आमदार ! कुणाचा गेम होणार ?