मुंबई : शिवसेना अपात्र आमदार याचिका प्रकरणावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकाल देणार आहेत. परंतु निकालाच्या आधी राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याबाबत आता उद्धव ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्र काढलं असून कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचे मंत्री अन् खासदार एकमेकांत भिडले! लोण्याचा गोळा मटवण्यासाठी हे भांडखोर बोके…, विरोधकांची जहरी टिका
शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर उद्या विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात निकालाचे वाचन केले जाणार आहेत. परंतु त्याआधीच पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधानसभा अध्यक्ष दोन वेळा मुख्यमंत्र्यांना भेटतात. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. परंतु न्यायमूर्ती आरोपीला भेटत असतील तर उद्या न्यायाची काय अपेक्षा करणार? असा सवाल ठाकरेंनी केला आहे.
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाच्या निकालाआधी ठाकरेंना मोठा धक्का, आमदार रविंद्र वायकरांच्या घरी इडीचा छापा
यातच आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी होती तेव्हाच जाणवले की तो वेळकाढूपणा सुरू होता. असं आजपर्यंत झालं नाही, लवाद म्हणून विधानसभा हे मुख्यमंत्र्यांना घरी जाऊन भेटले. आता ज्या भूमिकेत आहेत. हे आरोपीला भेटले. दोन वेळा भेटले आहेत. न्यायाधीश आणि आरोपीची मिलीभगत आहे का ? हे प्रकरण वैयक्तिक नाही. हे प्रकरण देशात लोकशाही जिवंत राहणार की हे हत्या करणार हे ठरवणारं आहे. असा घणाघात देखील ठाकरेंनी चढवला.
आम्ही जनतेच्या न्यायालयात लढणारी लोकं आहोत. जुलमी अत्याचार करणाऱ्यांचा अंत हा केलाच पाहिजे, ही शिकवण देणाऱ्या रामाचं मंदिर उभं राहतंय. त्याच्यामुळे या जुलमी राजवटीचा अंत जनता करेलच. असेही ठाकरेंनी सांगितले. तसेच मी सहानभूतीवर राजकारण करणारा नाही, न्यायावरती राजकारण करणारा आहे. असेही त्यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरेंचे दोन शिलेदार अडचणीत..! वायकरांच्या नंतर ‘या’ नेत्याच्या घरावर आयकर विभागाची धाड
हेही वाचा…“जोपर्यंत दिल्लीतील सरकार बदलत नाही तोपर्यंत..,” ईडी कारवायांवर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…“पुणे लोकसभेची जागा हातून निसटेल म्हणून..”, आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टिका
हेही वाचा…निकालाच्या आधी ठाकरे गटाच्या आमदारावर ईडीची धाड, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
हेही वाचा..“माझा नवरा वाघ होता अन मी त्याची वाघिण”, शरद मोहोळच्या पत्नीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय