मुंबई : शिवसेना आमदार अपात्र याचिकांवरील निकाल उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लावणार आहेत. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या या प्रकरणावरील निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार देखील कोसळू शकते. परंतु त्याआधी ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची नितेश राणे भेट घेणार, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
शिवसेना आमदार अपात्र याचिकांवरील निकालाच्या आधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळीच ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांच्या घरावर इडीने छापा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा रविंद्र वायकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टचा आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय. तसेच पालिकेच्या अखत्यारित असलेले क्रीडागंडण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम, तसेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या जमिनीवर बांधकाम करण्यात आला आहे. या हॉटेलची किंमत ३०० कोटी असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केला आहे.
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पुर्णविराम, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
दरम्यान, आज सकाळी साडे आठच्या दरम्यान ईडीचे अधिकारी रविंद्र वायकर यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणासंदर्भात कागदपत्रांची तपासणी आता सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याआधी रविंद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कोरोना काळात रविंद्र वायकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आशिर्वादाने ५०० कोटी छापले होते. त्यामुळे त्यांना आता जबाब तर देना पडेगा. अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेना आमदार अपात्र प्रकरण..! “शिंदे सरकार कोसळले तर काय करायचे ?” फडणवीसांसह भाजपची गुप्त बैठक
हेही वाचा…बीड जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार, ५४ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा..“पहिला भुंकप राहुल नार्वेकर राज्यात करतील,” शिवसेना अपात्र याचिका प्रकरणावर माजी मुख्यमंत्र्यांचं धक्कादायक विधान
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार