पुणे : भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा निवडणुकीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरात लवकर पोटनिवडणुक घ्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर आज कोर्टात सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीवर स्थिगिती दिली आहे. त्यामुळे पुणे लोकसभेची पोटनिवडणुक होणार नसून आता आगामी लोकसभा निवडणुकांमध्येच पुणे लोकसभेची निवडणुक होणार हे आता स्पष्ट झाले आहेत.
हेही वाचा..“हिंदू धर्मातील गद्दारांनी शरद मोहोळची हत्या केली”, भाजपच्या आमदाराच वादग्रस्त विधान
गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात यावी अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांना चार आठवड्यांची मुदत देत पुढील सात आठवड्यांनी सुनावणी ठेवली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने पुणे लोकसभा मतदारसंघात लवकरात लवकर पोटनिवडणुक घ्या. असे आदेश दिले होते. यातच मग निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता. हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे पुणे पोटनिवडणुकीला आता पुर्णविराम देण्यात आला आहे.
हेही वाचा…लोकसभेसाठी काॅंग्रेसने इच्छुकांचे मागितले अर्ज ; पुणे लोकसभेसाठी ‘या’ नेत्यांची जोरदार चर्चा
दरम्यान, आम्ही २०२४ च्या निवडणुक कामात तसेच देशातील इतर ठिकाणी सुरू असलेल्या निवडणुकांच्या कामात व्यस्त आहोत. त्यामुळे पुण्याची पोटनिवडणुक घेणे शक्य नाही. निवडणुक घेतली तरी काही महिन्यातच कार्यकाळ संपेल. असा युक्तिवाद आयोगाकडून करण्यात आला. मात्र.त्यानंतरही मुंबई उच्च न्यायालयाने आयोगाला लवकरात लवकर निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात आयोगाने सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती.
READ ALSO :
हेही वाचा“‘रक्षणकर्ते’ हेच जर ‘शोषणकर्ते’ होत असतील तर..” मुंबईच्या घटनेवरून आव्हाडांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भव्य भजन स्पर्धा’ ; चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला बक्षिस वितरणाचा सोहळा
हेही वाचा…रोखठोक भूमिका घेणारे किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या ‘या’ नेत्यांनीही ठाकरेंची वाट धरली
हेही वाचा…सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला मोठा दणका, बिल्किस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द
हेही वाचा..मुंबई हादरलं..! उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांकडून ८ महिला शिपायांवर ब’ला’त्का’र ; निष्क्रिय गृहमंत्री, विरोधकांची फडणवीसांवर टिका