पुणे : भाजपचे शहर चिटणीस लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लहू बालवडकर सोशल वेलफेअर तर्फे ‘चैतन्यस्पर्श’ हा भारतातली १२ शक्तिपीठांच्या पादुकादर्शनाचा अभूतपुर्व सोहळा नुकताच पार पडला. यावेळी महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धा देखील मोठ्या उत्साहात पार पडली. तर यावेळी दिव्यांची आरास, महिला व पुरूषांचे सामुहिक रामरक्षा पठण, ५१ तबला व पखवाज वादकांची जुगलबंदी अशा भक्तीमय कार्यक्रमांमुळे आजुबाजुचा परिसरही प्रसन्न होऊन गेला. ३ जानेवारी ते ५ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेची अंतिम फेरी ६ जानेवारीला झाली. भव्य भजन स्पर्धेचे बक्षिस वितरणाचा कार्यक्रम राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी लहू बालवडकर यांच्या कामाचं चंद्रकांतदादा पाटील यांनी भरभरून कौतूक केलं तर तुषार भोसले यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा…अजितदादा अन् शिंदेंच्या वादात भाजपचा गेम होणार ? लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी
विविध सामाजिक उपक्रमातुन सर्व सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांचा वाढदिवस सांप्रदायिक क्षेत्रांत भजनी मंडळांना चालना मिळावी या उद्देशाने लहू बालवडकर सोशल वेलफेअर वतीने भव्य व आगळी वेगळी स्पर्धा आयोजित केली जात आहे. परिसरातील जवळ पास १०० पेक्षा जास्त भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला. मागच्या वर्षाप्रमाणे याही वर्षी लोकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. यामध्ये भजन स्पर्धेचे पहिले बक्षिस आषाढी वारी भजनी मंडळ बाफळवाडी, राजगुरूनगर आणि स्वरांजली भजनी मंडळ मारुंजी यांना विभागून देण्यात आले. यासोबत रोख रक्कम आणि सन्मानचिन्हं, तसेच श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्येची प्रतिकृती देखील सप्रेम भेट देण्यात आली. यावेळी भव्य भजन स्पर्धेचे सुप्रसिद्ध युवा मृदंगवादन ओमकार दळवी आणि सुप्रसिद्ध युवा गायक नागेश आडगावकर यांनी सलग चार दिवस उत्कृष्टरित्या परिक्षण केल्याने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला.
हेही वाचा…पोलिस दलात खळबळ माजवून देणारी बातमी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ८ महिला पोलिसांवर कार्यालयातच ब’ला’त्का’र
लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअर आयोजित महिला व पुरूष भव्य भजन स्पर्धेचा निकाल
पुरूष भजन स्पर्धा
पहिले बक्षिस – आषाढी वारी भजनी मंडळ बाफळवाडी, राजगुरूनगर आणि स्वरांजली भजनी मंडळ मारुंजी ( विभागून )
द्वितीय पुरस्कार- ताजोबाई भजनी मंडळ ताजे मावळ आणि विठ्ठल प्रासदिक भजनी मंडळ शुक्रवार पेठ ( विभागून )
तृतीय पुरस्कार – संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ सोटेवाडी तळेगाव दाभाडे, आणि माऊली संगीत भजनी मंडळ, घरकुल, चिखली
चुतरार्थ पुरस्कार- स्वरागिनी भजनी मंडळ, आळंदी
महिला भजन स्पर्धा
प्रथम पुरस्कार- विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, बालेवाडी
द्वितीय पुरस्कार – विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ कोंडवा बु.
तृतीय पुरस्कार – नंदिनी महिला भजनी मंडळ, सुसगाव
चतुरार्थ पुरस्कार – गुरूकृपा महिला भजनी मंडळ, बालेवाडी
पाचवा पुरस्कार – श्री सावतामाळी महिला भजनी मंडळ
सहावा पुरस्कार- स्वरांजली महिला भजनी मंडळ पाथोडे
ओंकारनाथ भजनी मंडळ पिरंगुट, पुणे महिला भजनी मंडळ बाणेर बालेवाडी औंध यांचा देखील सन्मान करण्यात आला.
वैयक्तिक बक्षिसे :
उत्कृष्ट गायन – अश्विनी बुचडे मारूंजी, आणि भार्गव जाधव
उत्कृष्ट मृदंगवादन – कानोपात्रा पवार आणि ऋतिक जंगम
उत्कृष्ट हार्मोनियम – विजय कांबळे आणि बळीराम चव्हाण
उत्कृष्ट तबला वादक – केतन सावंत आणि ओम केदारी ताजे
लहू बालवडकर यांना यावेळी चंद्रकांत पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, लहू बालवडकर दरवर्षी प्रमाणे भजन स्पर्धा आयोजित करीत आले आहेत. दोन ते तीन दिवस चालणाऱ्या भजन स्पर्धे खूप लांबून लोक येत आहेत. लहू बालवडकर यांची लोकप्रियता इतकी आहे की, त्यांच्या कार्यक्रमाला लोक आवर्जून हजेरी लावतात. अशा भावना यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केल्या. तसेच लहू बालवडकर यांची प्रतिमा अशीच वाढत जावो आणि त्याचा कुठेतरी सामाजिक लाभ झाला पाहिजे. असेही चंद्रकांत पाटलांनी म्हटले.
तुषार भोसले म्हणाले की, काही ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने नाचगाण्यांचं कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जातो. अशा कार्यक्रमातून समाजाला काही मिळत नाही. परंतु लहू बालवडकर यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अशा पवित्र कार्यक्रम आयोजित केलं की त्यातून समाजाला समाधान मिळेल. समाजाला अध्यात्मिक सुख शांती मिळते. त्यांच्या दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने पादूकांचं दर्शन समाजाला मिळतं. त्यातून समाजाला एक प्रेरणा मिळते अशा भावना यावेळी भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, भाजप नेते तसेच शहर चिटणीस लहू बालवडकर यांनी सांगितले की, परिसरातील नागरिकांची सेवा विविध उपक्रमातून करत असताना आपला वाढदिवस या वेळी सांप्रदायिक क्षेत्रातील नागरीकांसाठी भजन स्पर्धा आयोजित करून साजरा करणार आहे. आपल्या परीसरात भजनी मंडळे मोठया प्रमाणात असून त्यांना चालना मिळावी उत्साह वाढावा व हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतुने नियोजन बद्ध भव्य स्वरूपात आगळी वेगळी भजन स्पर्धा पुरुष आणि महिलांसाठी आयोजित केली आहे. जवळपास शंभर पेक्षा अधिक भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी होणार असून आपला परीसर टाळ मृदंगाच्या गजरात दमदमून जाईल. प्रत्येक वर्षी सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला जातो. इतून पुढे देखील अशा वेगवेगळ्या स्पर्धा सुरू ठेवून एक हक्काचे व्यासपीठ स्पर्धकांना उपलब्ध करून देणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…रोखठोक भूमिका घेणारे किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या ‘या’ नेत्यांनीही ठाकरेंची वाट धरली
हेही वाचा…सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला मोठा दणका, बिल्किस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द
हेही वाचा..मुंबई हादरलं..! उपायुक्त व दोन पोलिस निरीक्षकांकडून ८ महिला शिपायांवर ब’ला’त्का’र ; निष्क्रिय गृहमंत्री, विरोधकांची फडणवीसांवर टिका
हेही वाचा..“हिंदू धर्मातील गद्दारांनी शरद मोहोळची हत्या केली”, भाजपच्या आमदाराच वादग्रस्त विधान
हेही वाचा…लोकसभेसाठी काॅंग्रेसने इच्छुकांचे मागितले अर्ज ; पुणे लोकसभेसाठी ‘या’ नेत्यांची जोरदार चर्चा