पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात कॉंग्रेस हायकमांडने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज मागितले आहेत. मंगळवारपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. यातच आता पुणे लोकसभेसाठी मागील काही महिन्यांपासून अनेकांची नावे चर्चेत आली होती. तर कॉंग्रेसकडून शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यांसदर्भात पत्रक काढल्याचे समोर आले आहेत.
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला “चैतन्यस्पर्श” अभूतपूर्व सोहळा, दिग्गजांची हजेरी,भाविकांची मोठी गर्दी
आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीने इच्छुकांचे अर्ज मागितले आहेत महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीने आदेश दिल्यानंतर पुणे शहाराचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी इच्छुकांबद्दल एक पत्रक काढले आहे. त्यामुळे पुणे लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुकांना उद्यापर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता पुणे लोकसभेसाठी कॉंग्रेस कडून कोण अर्ज करणार ? त्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा…“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
दरम्यान, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आता याठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने तयारी सुरू केली आहे. पुणे लोकसभेसाठी काॅंग्रेसचे माजी खासदार मोहन जोशी इच्छुक असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले आहेत. तर कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकरांनी देखील निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. तर यातच शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांचेही भावी खासदार म्हणून काही दिवसांपुर्वी बॅनर लागले आहेत. त्यामुळे आता पुणे लोकसभेतून कॉंग्रेस कुणाच्या नावांवर उमेदवारीचा शिक्कामोर्तब करणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अजितदादा अन् शिंदेंच्या वादात भाजपचा गेम होणार ? लोकसभेच्या जागांवरून महायुतीत वादाची ठिणगी
हेही वाचा…पोलिस दलात खळबळ माजवून देणारी बातमी, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ८ महिला पोलिसांवर कार्यालयातच ब’ला’त्का’र
हेही वाचा..“फडणवीसांच्या गळ्यात सध्या दिल्लीचा गुलामीचा पट्टा “, ठाकरे गटाचा जोरदार पलटवार
हेही वाचा..भाजपने लोकसभेसाठी वेगळी रणनिती आखली, ४० ते ५५ वर्षाच्या उमेदवारांना भाजप मैदानात उतरवणार
हेही वाचा…“जोपर्यंत मी जितेंद्र आव्हाड यांना भेटत नाही”, कर्करोगाशी लढणाऱ्या तरूणाने आव्हाडांसमोर ठेवली ‘ही’ इच्छा