मुंबई : राष्ट्रवादीच्या नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्वत: सोबत आलेला अनुभव शेअर केला असून कर्करोगाशी लढणाऱ्या एका तरूणाबाबत आव्हाडांनी भरभरून लिहिलं आहे. कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यापुर्वी या तरूणाने जितेंद्र आव्हाडांच्या भेटीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही गोष्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…मावळात पार्थ पवार तर शिरूरमधूनही आपला उमेदवार असणार, मग शिंदे जाहीर सभा का घेताहेत? अजित पवार म्हणाले….
आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटले आहे की, प्रेम म्हणजे असती तरी काय ? या गोष्टीचा प्रत्यक्ष साक्षात्कार झाला आहे. माझ्या बाजूला उभा असलेल्या या मुलाची आत्ता कर्करोगाची शस्त्रक्रिया सुरू आहे. हा कॅन्सर कुठवर पसरलाय, हे त्यालाही माहिती नाही आणि डॉक्टरांनाही माहित नाही. काल रात्री त्याला रूग्णालयात दाखल करायचे होते. पण त्याच्या घरच्यांना त्याने सांगितले की जोपर्यंत मी जितेंद्र आव्हाड यांना भेटत नाही. तोपर्यंत मी एडमिट होणार नाही. त्याला मी म्हटले की मी तुझ्या घरी येतो. पण तो म्हणाला. मी तुमच्या घरी येतो. मी रात्री संगमनेरहून आलो अन् तो मला भेटला असल्याचं आव्हाडांनी सांगितले.
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच
दरम्यान, तो घरासमोर उभा असल्याने खरं तर माझेच डोळे भरून आले होते. काय घडेल, याची त्याला कल्पना नसेलच किंवा ती कल्पना न केलेलीच बरी. पण जेव्हा मी मागे वळून बघतो, आपण काय कमावलं. हे जेव्हा स्वत:लाच विचारतो. तेव्हा त्याचे उत्तर म्हणजे हा मुलगा आहे आणि यालाच प्रेम म्हणतात. बाकी सगळं खोट आहे. तो लवकर बरा होऊ दे हीच प्रार्थना. असेही आव्हाड म्हणाले.
प्रेम म्हणजे असते तरी काय?
माझ्या बाजूला उभा असलेल्या या मुलाची
आत्ता कर्करोगाची शस्त्रक्रिया सूरु आहे. हा कॅन्सर कुठवर पसरलाय, हे त्यालाही माहित नाही आणि डाॅक्टरांनाही माहित नाही. काल रात्री त्याला रूग्णालयात दाखल करायचे होते. पण, त्याच्या घरच्यांना त्याने सांगितले की,…— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला “चैतन्यस्पर्श” अभूतपूर्व सोहळा, दिग्गजांची हजेरी,भाविकांची मोठी गर्दी
हेही वाचा“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..“ओबीसींना खिंडित गाठलंय, शिंदे समिती बरखास्त करा,” गोपीचंद पडळकरांचा सरकारला घरचा आहेर
हेही वाचा..मुन्ना पोळेकराला मोहरा बनवला, ‘शरद मोहोळ’ हत्या प्रकरणाचा खरा मास्टर माईंड आला समोर
हेही वाचा…लोकसभेच्या ४८ जागांपैकी मनसेच्या १४ उमेदवारांची यादी जाहीर ; राज ठाकरेंचे शिलेदार अनेकांना धक्का देणार