पुणे : भाजप पाठोपाठ शिंदे गटाने देखील लोकसभेच्या दृष्टीने शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. याची सुरूवात आज मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून केली जात आहे. अगोदरच शिरूर लोकसभेचा उमेदवार निवडून आणणार असं विधान अजित पवारांनी केलं होतं. परंतु तरीही एकनाथ शिंदे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांची सभा घेत आहेत. तसेच मावळमधून पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…घरात एकत्र जेवण केलं अन् बाहेर काढला काटा ; शरद मोहोळच्या ह’त्ये’चा’ सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
मावळलोकसभा मतदारसंघातून पार्थ पवारांसाठी आमदार प्रयत्न करीत आहेत. तर तुम्ही स्वत: शिरूरचा उमेदवार निवडून आणणार असं विधान केलं होतं. परंतु आता आपल्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदे मावळ आणि शिरूरमध्ये सभा घेत आहेत. यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, लोकसभेच्या जागावाटपासाठी भाजप तसेच शिंदे गटातील नेते आणि आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ. वेगवेगळे कार्यकर्ते सहकारी आपापल्या परीने भूमिका मांडत आहेत. परंतु महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहोत. त्यामुळे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आणू, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. मावळबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आम्ही एकत्रित चर्चा करू, तसेच समज गैरसमज निर्माण झाले असतील तर ते आम्ही दुर करू. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…कुख्यात गुंड ”शरद मोहोळ”च्या ह’त्ये’ची चित्तथरारक काहाणी, आतापर्यंत काय काय घडलं ? वाचा सविस्तर
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिरूरमध्ये सभा होत आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा मतदारसंघात येताहेत. त्यांच मी मनापासून स्वागत करतोय, खरं शेतकऱ्यांच्या आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोहचला असेल. त्यांच्या सभेकडे भाषणाकडे माझं लक्ष राहणार आहे. यातच शासनाच्या योजना किंवा सामान्य माणसांसाठी काही घेऊन आले असते तर नक्कीच आनंद झाला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या निर्यातबंदी विषयी बोलावं. दुधाला सरसकट पाच रूपये देण्याच्यासंदर्भात बोलावं. बिबट प्रवण भागाविषयीही बोलावं, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…तळ कोकणात जागावाटपावरून महायुतीत राजकीय शिमगा ; सिंधूदूर्ग-रत्नागिरी लोकसभेवरून मोठी रस्सीखेच
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा“हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय”, राज ठाकरेंचा मोदी-शहांवर हल्लाबोल
हेही वाचा…“मयतासोबतच आरोपींचा २५ दिवसांपासून वावर, कट रचला अन्..” शरद मोहोळ ह’त्या’प्रकरणी पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
हेही वाचा.२२ जानेवारीला कोण कोण जाणार ? कुणाला निमंत्रण ? उद्धव ठाकरे २२ जानेवारीला काय करणार ?