पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची काल कोथरूड भागात हत्या करण्यात आली. लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या शरद मोहोळ याच्याच साथीदारांनी गोळ्या झाडल्या. सुरूवातीला साथीदारांनी घरात एकत्र जेवण केलं. त्यानंतर बाहेर पडले असता पाठीमागून शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात शरद मोहोळ गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी शरद मोहोळला मृत्य घोषित करण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा…शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..
शरद मोहोळ याच्या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये शरद मोहोळ आपल्या काही साथीदारांसोबत घरातून बाहेर पडला. त्यावेळी शरद मोहोळ यांनी पिवळ्या रंगाचा शर्ट घातलेला सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. शरद मोहोळ त्याचे बॉडीगार्ड विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहील पोळेकर हे घराबाहेर पडले. शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी दोन गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या. तर एक छातीत तर एक गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली. यानंतर शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. अन् आरोपींना त्याठिकाणांहून धुम ठोकली. यावेळी त्याठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला.
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला
दरम्यान, गोळ्या झाडणारे तीन मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारालासह सुतारदरा भागातून पळाले. त्यांचे आणखी चार साथीदार त्यांच्यासाठी एक स्विप्ट कार आणि एक एक्स व्ही यु गाडी घेऊन हजर होते. शरद मोहोळवर हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अन् त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. यातच शरद मोहोळ याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी शरद मोहोळला मृत्य घोषीत केले. यामुळे रूग्णालयात जवळपास चारशे ते पाचशे जणांचा जमाव गोळा झाला. त्यानंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त त्याठिकाणी तैनात करण्यात आला.
यातच शरद मोहोळवर हल्ला करणाऱ्या तीन आरोपींपैकी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकरचे नाव समोर आले. आर्थिक आणि जामिनीच्या वादातून शरद मोहोळ याचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. यातच पुण्यातील खेड शिवापूर जवळील भागात लपून बसलेल्या तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर या प्रकरणातीतल मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला देखील पोलिसांनी अटक केली.
घरात एकत्र जेवण केलं अन् बाहेर काढला काटा ; शरद मोहोळच्या ह’त्ये’चा’ सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर pic.twitter.com/RkUiquDEIQ
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) January 6, 2024
READ ALSO :
हेही वाचा…कुख्यात गुंड ”शरद मोहोळ”च्या ह’त्ये’ची चित्तथरारक काहाणी, आतापर्यंत काय काय घडलं ? वाचा सविस्तर
हेही वाचा…मोठी बातमी..! “..म्हणून योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची दिली धमकी, “आरोपीला ठाण्यात पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…शरद मोहोळ याच्या ह’त्ये’ची’ इनसाईड स्टोरी ; ह’त्ये’चा कट काही वर्षापासून शिजत होता
हेही वाचा..मावळ अन् शिरूर लोकसभेवरून महायुतीत पेच वाढला, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली