पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा काल पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोथरूडमधील तुतारदरा येथील कार्यालयासमोरच भरदिवसा चार व्यक्तींनी गोळ्या झाडल्याने मृत्यू झाला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपींची शोध मोहिम केली असता शरद मोहोळ याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात सादर केले जाणार आहे. यावर आता राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक
शरद मोहोळ याच्या हत्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारांना कडक शब्दात इशारा दिलाय. या घटनेमुळे राज्यात कुठेही टोळीयुद्ध होणार नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होणार नाही. सदर कुख्यात गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली आहे. गुंड कुणीही असो. त्याचा बंदोबस्तच शासनाद्वारे केला जातो. त्यामुळे असे टोळीयुद्ध करण्याचा कुणीही प्रयत्न करणार नाही. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधतांना दिली आहे.
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं
दरम्यान, शरद मोहोळ याची जमिनीचा आणि पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शरद मोहोळ आणि मुख्य आरोपी साहिल पोळेकर याच्यातच जमिनीचा आणि पैशांचा वाद होता. त्या वादातून ही हत्या झाली आहे. साहिल पोळेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात कोथरूड पोली स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेची ९ तपास पथके तयार करून आरोपींना शोधून काढले.
READ ALSO :
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला
हेही वाचापुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका