कोल्हापूर : स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विरोध केल्याने ठाकरे गटाने मुरलीधर जाधव यांची जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. राजू शेट्टी यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका. पक्षासाठी आम्ही खुप काही केलंय, असं मुरलीधर जाधव यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ठाकरे गटानं त्यांना पदावरून हटवलं. यातच आज पत्रकार परिषद घेऊन मुरलीधर जाधव यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलतांना मुरलीधर जाधव यांना अश्रू अनावर आलेत. यावेळी त्यांनी ठाकरे गटातील नेत्यांवरही आरोप लावले आहेत.
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?
सुषमा अंधारे, हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांनी राजकीय डावपेच रचले. त्याचा परिणाम म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदावरून कमी केले असा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला. त्यातच उद्धव ठाकरे हे माझे दैवत आहे. उद्धव ठाकरे हे माझे दैवत आहे. बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालो आहे. माझ्या मनात कोणतंही पाप नाही. असं म्हणत मुरलीधर जाधव यांनी ठाकरेंसोबतच राहणार असल्याचं संकेत दिलेय.
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
दरम्यान. आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना हातगणंकले यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. चार दिवसापुर्वी मुरलीधर जाधव यांनी सतत राजकीय भूमिका बदलणाऱ्या शेट्टी यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. याच मागणीचा पुनरूच्चार त्यांनी आज केला. शिवसेनेने आतापर्यंत रघुनाथदादा पाटील, संजय पाटील, धैर्यशील माने असे उमेदवार आयात केले आहे. धैर्यशील माने हे पक्षातून निवडून येऊन पक्ष सोडून गेले. यावेळी इंडिया आघाडी- महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याने कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी दिल्यास तो निश्चितपणे निवडून येईल असा दावाही त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचापुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?