पुणे : भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावल्याची घटना आज घडली आहे. पुण्यातील ससून रूग्णालयात तृतीयपंथीया करीत विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, आमदार सुनील कांबळे, आमदार रविंद्र धंगेकर, ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांच्यासह आजी-माजी अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली येत असतांना सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केली आहे. यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी कांबळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
अमर्याद सत्तेने मदमस्त झालेले भाजपचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहेतच, परंतु सत्तेची हवा आता त्यांच्या इतकी डोक्यात गेली आहे की कायद्याचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात भाजपचे लोकप्रतिनिधी अग्रेसर आहेत. भाजपचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करणार की त्यांना क्लीनचिट देणार हे आता बघावे लागेल. जनता मात्र हा मस्तवालपणा उतरविल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढे मात्र नक्की, असा जोरदार घणाघात काॅंग्रेसने चढवला आहे.
तर फडणवीस गृहमंत्री असतानाच का अशा घटना घडतात? ससून येथील कार्यक्रमात भाजप आमदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या महायुती सरकारचं चाललंय काय? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाने केला आहे. तसेच अहिंसेच्या मार्गाने सुरु मराठा आरक्षण आंदोलनावर लाठीचार्ज काय होतो, वारकऱ्यांवर लाठीचार्ज होतो ते करण्याचे आदेश नेमके कोण देतं? एक मंत्री पोलिसांना जनतेला मारायला काय सांगतो, आमदार पोलिसांना मारतो काय, हे अतिशय गुंड प्रवृत्तीचे सरकार आहे. पोलीस हे जवाबदार शासकीय कर्मचारी असून तुम्ही त्यांचे मालक नाहीत. असा संताप देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाने व्यक्त केलाय.
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश
दरम्यान, पोलिसांवर अन्याय होत असताना राज्याचे गृहमंत्री गप्प का? आपल्या पक्षाच्या आमदारावर कारवाई करण्याच्या सूचना ते आपल्या विभागाला देतील का? या ट्रिपल इंजिन खोके सरकारकडून सामान्य जनतेसह पोलिसांवर होत असलेली दादागीरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही. राज्यातील जनता हे उघड्या डोळ्याने पाहत आहे, ही सत्तेची मस्ती जास्त काळ टिकत नसते. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
यातच काल अब्दुल सत्तार आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज . भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो..अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय.
काल अब्दुल सत्तार
आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज …
भाजप आमदाराची मस्ती इतकी की ड्युटीवर असलेल्या पोलीस जवानाच्या थोबाडीत हाणली, थेट खाकी वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदार मध्ये आली कशी?गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस अधिकाऱ्याला मारहाण… pic.twitter.com/j8QhIL6Nua
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 5, 2024
महायुती सरकारचे मंत्री, नेते व आमदारांची सामान्य जनतेसह पोलिसांवर माजोरी; फडणवीस गृहमंत्री असतानाच का अशा घटना घडतात?
ससून येथील कार्यक्रमात भाजप आमदाराने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावल्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. या महायुती सरकारचं चाललंय काय? अहिंसेच्या मार्गाने… pic.twitter.com/wHAEd6AwwP
— NCP (@NCPspeaks) January 5, 2024
READ ALSO :
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार