नाशिक : येत्या काही महिन्यात लोकसभेची निवडणुक होऊ घातली आहे. राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना रंगण्याची शक्यता आहे. यातच मागच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढणारे नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या आधी दोन्ही बाजूंच्या नेत्यांना जागावाटपाचा मोठा अडथळा पार करावा लागणार आहे. त्याचा प्रत्यय म्हणून नाशकात भाजप आणि अजित पवार गटात बॅनरबाजी बघायला मिळत आहे.
हेही वाचा…राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा संपुर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार यात्रा
महायुतीमध्ये आतापासूनच विधानसभेच्या जागावरून रस्सीखेच पाहायला मिळत आहेत. सलग दोन वेळा नाशिक मध्य मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहाराध्यक्ष रंजन ठाकरे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. परंतु त्यासमोरच देवयानी फरांदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाराही पोस्टर झळकला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीपुर्वी विधानसभेसाठी महायुतीत जागावाटपांवरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
हेही वाचा…“‘ती’ संधी आता आम्ही सोडणार नाही”, अमोल कोल्हेंचं मोठं विधान
दरम्यान, रंजन ठाकरे यांची नामको बॅंकेच्या उपाध्यक्षपदी तसेच नाशिक जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल भावी आमदार म्हणून बॅनर लागले आहेत. या बॅनरवर शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक मोठमोठ्या नेत्याचेही फोटो झळकले आहेत. त्याच्याच दुसऱ्या बाजूला देवयानी फरांदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकी आधीच या मतदारसंघावरून चढाओढ बघायला मिळत आहे.
READ ALSO :
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
हेही वाचा…“तर गृहमंत्र्यांनी ‘या’ महाशयांवर कठोर कारवाई करा,” रूपाली चाकणकरांची आव्हाडांवर खोचक टिका