यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि माझ्यात आठ ते दहा दिवसांपुर्वी सकारात्मक चर्चा झाली. यावेळी यवतमाळ- वाशिम लोकसभेच्या तयारीचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी विजयाचं संकल्प ठेवलं आहे. तो संकल्प पुर्ण करण्यासाठी तसेच बंजारा समाजाला न्याय देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारीबाबत शब्द दिल्यामुळे एक नवचैतन्य निर्माण झालं आहे. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभेचा उमेदवार म्हणून मी लढण्यास तयार आहेत, त्याची तयारी देखील सुरू केली असल्याचं पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांनी सांगितले.
हेही वाचा…“‘ती’ संधी आता आम्ही सोडणार नाही”, अमोल कोल्हेंचं मोठं विधान
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकीटावर भावना गवळी निवडून आल्या आणि काॅंग्रेसचे माणिकराव ठाकरे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत झाले. यवतमाळ -वाशिम मतदारसंघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून याठिकाणी सेवालाल महाराजांचां मंहत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या जागेसाठी आदेश दिला असून ही जागा मिळण्यासाठी तुम्हाला तिकिट दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…धुळ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन ; कार्यकर्ते आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
यातच दिल्लीत झालेल्या बैठकीत काॅंग्रेससोबत समन्यव घडवून आणू व यवतमाळ-वाशिम जागा शिवसेना ठाकरे गटाकडे खेचून आणू. संजय राऊतांनी एक प्रतिक्रिया दिली होती की जिंकेल त्याची जागा त्यामुळे २०१९ सालच्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेने जिंकली होती. त्यामुळे ती जागा आम्हाला मिळणार तसेच आमची मागणी २३ जागा असून ती मागणी देखील पुर्ण होणार आहे.
दरम्यान, महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण संस्थेतील १९ कोटी रूपयांचा हिशोब देण्याकरिता भावना गळवी यांना दोन दिवसांपुर्वी नोटीस बजावली आहे. भावना गवळी जरी खासदार असल्या तरी देशाच्या निवडणुकीत मोठमोठे नेते देखील पराभूत झाले आहेत. देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राहुल गांधी सारखे पराभूत झाले आहेत. यातच आता भावना गवळींना देखील जनता त्यांची जागा दाखवून देतील. संजय राठोड जरी महायुतीचे उमेदवार असतील तरी ते एकटे बंजारा समाजाचे नेते नाहीत. यातच सध्याच्या परिस्थितीत बंजारा समाजाचा विश्वास महायुतीच्या नेत्यांवरून उडून गेलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मला हिरवा सिंग्नल दिला असून निश्चितच आमचा विजय होईल असंही सुनील महाराज यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
हेही वाचा…“तर गृहमंत्र्यांनी ‘या’ महाशयांवर कठोर कारवाई करा,” रूपाली चाकणकरांची आव्हाडांवर खोचक टिका
हेही वाचा..राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा संपुर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार यात्रा