पुणे : प्रख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. भरदिवसा पुण्यात झालेल्या गोळीबाराने एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील उच्चभ्रू रहिवाशांचा परिसर असलेल्या कोथरूड परिसरात हा गोळीबार झाला आहे. या घटनेत शरद मोहोळ गंभीर जखमी झाले असून त्याला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील चौकशी पोलिस करीत आहेत.
हेही वाचा…“तर गृहमंत्र्यांनी ‘या’ महाशयांवर कठोर कारवाई करा,” रूपाली चाकणकरांची आव्हाडांवर खोचक टिका
प्रख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहण यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या खुन प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन मिळाल्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले याचे अपहरण केल्या प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
हेही वाचा…राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेचा संपुर्ण वेळापत्रक, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातून जाणार यात्रा
दरम्यान, येरवडा कारागृहात असताना कतील सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ततात करण्यात आली. त्यानंतरही गुन्हेगारी कृत्य सुरूच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. यातच आता पुण्यात कोथरूड परिसरात त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या आहेत. एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली आहे. त्यामुळे त्याला आता सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गोळीबार करतात आरोपी फरार झाले असून पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश