पुणे : कार्यक्रमाच्या कोनशिलेवर नाव नसल्याने भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसांच्या कानशिलात लगावली असल्याची घटना घडली आहे. पुण्यातील ससून रूग्णालयात तृतीयपंथीया करीत विशेष वॉर्ड तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, आमदार सुनील कांबळे, आमदार रविंद्र धंगेकर, ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता विनायक काळे यांच्यासह आजी-माजी अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा..आदित्य ठाकरेंना मोठा धक्का, वरळीतील माजी नरसेविकाचा शिंदे गटात प्रवेश
कार्यक्रमाच्या कोनशिलेवर नाव नसल्याने नाराज होऊन सुनील कांबळे व्यासपीठावर खालून येत होते. त्यावेळी सुनील कांबळे यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारल्याची घटना घडली. त्यावेळी नेमकं काय घडलं हे कोणालाही समजलं नाही. त्यानंतर कांबळे यांनी बाहेर येऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. माझे नाव कोनशिला बसविणाऱ्या अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडून काहीतरी चूक झाली. “मी या रागातून मी मारहाण केली नाही. माझे नाव नाही म्हणून मी मारहाण करेल, यात तथ्य नाही”, असेही आमदार कांबळे म्हणाले.
हेही वाचा…जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
यातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबाबत स्पष्टीकरत देतांना आमदार कांबळे म्हणाले की, मी फक्त त्या व्यक्तीला ढकललं. मी कानशिलात मारली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहितीये. असंही ते म्हणाले. पोलिसकर्मचाऱ्याला मारहाण केल्याबाबत स्पष्टीकरण देताना आमदार कांबले म्हणाले की, मी फक्त त्या व्यक्तिला ढकललं. मी कानशिलात मारली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहितीये.
अमर्याद सत्तेने मदमस्त झालेले भाजपचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्य जनतेला त्रास देत आहेतच, परंतु सत्तेची हवा आता त्यांच्या इतकी डोक्यात गेली आहे की कायद्याचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांना देखील मारहाण करण्यात भाजपचे लोकप्रतिनिधी अग्रेसर आहेत. भाजपचे पुण्यातील आमदार सुनील कांबळे यांच्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करणार की त्यांना क्लीनचिट देणार हे आता बघावे लागेल. जनता मात्र हा मस्तवालपणा उतरविल्याशिवाय गप्प बसणार नाही एवढे मात्र नक्की. अशी टिका काॅंग्रेसने केलीय.
READ ALSO :
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा