पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर धाड पडली आहे. इडीच्या अधिकाऱ्यांनी बारामती अॅग्रो कंपनीच्या सहा ठिकाणांवर धाड मारली आहे. पुणे, बारामतीसह संभाजीनगरातील कार्यालयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे रोहित पवार परदेशात असताना ही धाड मारण्यात आलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावरून आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टिका केली आहे. तर मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यावर पलटवार केलाय.
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या
ज्यांच्यावर संशय आहे, अशा सर्वांवर संपुर्ण देशात छापेमारी सुरू आहे. तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचा कारण नाही. अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. तसेच देशभरात स्वच्छता मोहीम चालू आहे. मात्र राजकीय आकसासातून अस म्हणण्याचं काही कारण नाही. अधिकारी डायरेक्ट रेड करत नाही. सर्व चौकशी आणि तपासणी करूनच काही संशयास्पद वाटल्यास ते रेड करतात. अनधिकृत पैसा आहे. २ नंबरवाले आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आहे. मोठमोठ्या व्यक्तींवर या कारवाया झालेल्या आहे आणि या संपुर्ण देशभरात सुरू आहेत. ते प्रामाणिक असतील तर त्यांना घाबण्याचे कारण नाही. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’
दरम्यान. बारामती अॅग्रो कंपंनीवर धाड टाकल्यानंतर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवारांनी राज्यातील महापुरूषांचा फोटो ट्विट केला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल.
READ ALSO :
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी