पुणे : पुण्यातील कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळ याच्यावर पुण्यातील कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला. शरद मोहोळ कोथरूडमधील सुतारदरा याठिकाणी जात असताना दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी त्याच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ त्याच्या खांद्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळवर कोथरूडमधीलच खासगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यात आता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यातच आज शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस होता. परंतु तो साजरा करण्याच्या आधीच त्याचा अंत झाला आहे.
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार
शरद मोहोळ याच्यावर कोणत्या कारणासाठी हल्ला करण्यात आला किंवा हल्लेखोर नेमके कोण होते, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, शरद मोहोळची अशाप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, प्रख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहण यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या खुन प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन मिळाल्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले याचे अपहरण केल्या प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
हेही वाचा…पुण्यात पुन्हा लागले ‘या’ नेत्याचे भावी खासदार म्हणून फ्लेक्स, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
दरम्यान, येरवडा कारागृहात असताना कतील सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ततात करण्यात आली. त्यानंतरही गुन्हेगारी कृत्य सुरूच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. यातच आता पुण्यात कोथरूड परिसरात त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या आहेत. एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली आहे. त्यामुळे त्याला आता सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गोळीबार करतात आरोपी फरार झाले असून पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’