पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रभू श्रीराम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते असं वक्तव्य केल्यानंतर भाजपने आव्हाडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काल दिवसभरात आव्हाडांच्या विरोधात आंदोलने करण्यात आलीत. तर हिंदू धर्माच्या भावना दुखवल्याची तक्रार पुण्यात नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे आव्हाडांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा मतदारसंघावरून रस्सीखेच ; नाशकात भाजप अन् अजित पवार गटात ‘बॅनरवॉर’
राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिर्डीत चिंतन शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरामध्ये भाषण करताना जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. राम हे शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. भाजप नेत्यांकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर सडकून टीका केली जात आहेत.
हेही वाचा..भावना गवळींच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, लोकसभेची तगडी लढत होणार
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनही आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आव्हाडांवर देशभरातून टीकेची झोड उठत असताना त्यांनी याप्रकरणावर खेद व्यक्त केलाय. तर जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू, असा इशारा परशूराम सेवा संघाने दिला आहे. मुर्ख माणसाने रामाची आणि ब्राह्यम समाजाची बदनामी केल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाषण बंदी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करत परशूराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या