पुणे : पुण्यातला कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळवर दिवसाढवळ्या गोळीबार करण्यात आला. कोथरूड भागात केलेल्या या गोळीबारात शरद मोहोळ याचा रूग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. शरद मोहोळ याच्यावर दोन अज्ञात व्यक्तीनी धडाधड तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी शरद मोहोळ याच्या खांद्याला लागली. हल्ला झाल्यानंतर शरद मोहोळला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याला डॉक्टरांनी मृत्यू घोषित करण्यात आले. शरद मोहोळच्या मृत्यूची माहिती कळताच रूग्णालयाबाहेर चारशे ते पाचशे जणांचा जमाव गोळा झाला आहे.
कोथरूडच्या सुतारदा परिसरात सव्वा एकच्या दरम्यान मोटारसायकलवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावर गोळीबार केला. हल्ला केलेल्या दोघांची नावं समोर आली आहेत. शरद मोहोळ याच्यासोबत असलेला साहील उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याने आणि त्याच्या इतर साथीदार यांनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांचा रोल नेमका काय आहे . याबाबत अजूनही काहीही स्पष्टता नाही. परंतु शरद मोहोळची हत्या त्याच्या गुन्हेगारी वैमनस्यामधून झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा.. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर ईडी धाड, सहा ठिकाणी एकाच वेळी छापेमारी
कोण आहे शरद मोहोळ ?
शरद मोहोळ याच्यावर कोणत्या कारणासाठी हल्ला करण्यात आला किंवा हल्लेखोर नेमके कोण होते, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, शरद मोहोळची अशाप्रकारे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील वाढती गुन्हेगारी हा नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यात शरद मोहोळची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
प्रख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहण यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शरद मोहोळ आणि साथीदारांनी टोळीयुद्धातून गणेश मारणे टोळीतील पिंटू मारणे याचा खून केला होता. नीलायम चित्रपटगृहाजवळ एका हॉटेलमध्ये ही घटना घडली होती. या खुन प्रकरणात त्याला अटक झाली होती. या खटल्यात जामीन मिळाल्यानंतर दासवे येथील सरपंच शंकर धिंडले याचे अपहरण केल्या प्रकरणी त्याला पुन्हा अटक करण्यात आली होती.
हेही वाचा…प्रख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, पुण्यातील कोथरूडमध्ये एकामागून तीन झाडल्या गोळ्या
दरम्यान, येरवडा कारागृहात असताना कतील सिद्दीकीचा त्याने खून केला होता. या खटल्यातून त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्ततात करण्यात आली. त्यानंतरही गुन्हेगारी कृत्य सुरूच होती. यामुळे जुलै २०२२ मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले होते. यातच आता पुण्यात कोथरूड परिसरात त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या आहेत. एक गोळी त्याच्या खांद्यावर लागली आहे. त्यामुळे त्याला आता सह्याद्री रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. गोळीबार करतात आरोपी फरार झाले असून पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?