नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगाने राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. काही दिवसात इंडिया आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. यातच राज्यात महाविकास आघाडीमध्ये कशापद्धतीने जागा वाटप केल्या जातात ? याची चर्चा सुरू आहे. तर जो जिंकेल त्याला उमेदवारी दिली जाईल. असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं
उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकीसाठी मराठवाड्याची झाडाझडती घेतली. मराठ्यवाड्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस शिवसेना एकत्र लढतील. कुणीही मागच्या दाराने भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही. काॅंग्रेससोबत चांगली बोलणी झाली असून २ ते ४ दिवसांत दिल्लीत जाणार आहे. काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहे. नाना पटोले आणि खरगे यांच्याकडून जागांसंदर्भात वक्तव्य आलेलं नाही. पण आम्हाला खात्री आहे की आम्ही जिंकू. जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार. काॅंग्रेसने कोणत्याही जास्त जागा मागितल्या नाही. असं राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्यासंदर्भात आज भाजपची महत्वपुर्ण बैठक दिल्लीत होत आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. सगळ्या राज्यांचे अध्यक्ष आणि प्रभारी या बैठकीत सहभागी होणार असून या बैठकीमध्ये जबाबदारी निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. यातच राम मंदिर उद्घाटन आणि राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला
हेही वाचापुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक