पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा काल पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोथरूडमधील तुतारदरा येथील कार्यालयासमोरच भरदिवसा चार व्यक्तींनी गोळ्या झाडल्याने मृत्यू झाला आहे. हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी लगेचच आरोपींची शोध मोहिम केली असता शरद मोहोळ याचा साथीदार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात सादर केले जाणार आहे.
हेही वाचा..“सत्तेची हवा यांच्या डोक्यात गेलीय,” भाजपच्या आमदाराची पोलिसांना मारहाण, फडणवीस कारवाई करणार का ?
शरद मोहोळ याची जमिनीचा आणि पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शरद मोहोळ आणि मुख्य आरोपी साहिल पोळेकर याच्यातच जमिनीचा आणि पैशांचा वाद होता. त्या वादातून ही हत्या झाली आहे. साहिल पोळेकरसह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात कोथरूड पोली स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हे शाखेची ९ तपास पथके तयार करून आरोपींना शोधून काढले.
हेही वाचा…व्यासपीठावर अजिदादा अन् भाजपच्या या आमदाराने पोलिसाच्या लगावली कानशिलात, नेमकं काय घडलं ?
पुणे शहाराच्या परिसरात आणि पुणे ग्रामीण, सातारा व कोल्हापुर परिसरता आरोपी मिळाले. पुणे सातारा रोडवर किकवी-शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विप्ट गाडीचा पाठलाग करून ८ आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ३ पिस्टल, ३ मॅगझीन, ५ राऊंड व २ चार चाकी गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहेत.
दरम्यान, शरद मोहोळ याच्या लग्नाचा पाच जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यामुळे त्याला शुभेच्छा देण्याऱ्यांची गर्दी होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी तो कार्यालयातून बाहेर पडला. इतक्यात गर्दीतून चार जण पुढे आले. त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर बेछूट गोळीबार केला. गंभीर जखमी अवस्थेत मोहोळ याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याच्या खांद्याला गोळ्या लागल्या. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.
READ ALSO :
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला
हेही वाचापुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक
हेही वाचा…पुण्यात कुख्यात गॅंगस्टार शरद मोहोळची भरदिवसा ह’त्या; लग्नाच्या वाढदिवशीच दोघांनी संपवलं