पुणे : मागील काही दिवसापासून पुणे शहरात पुन्हा गॅंगवार सुरू झाले आहे. कुख्यात गॅगस्टर शरद मोहोळ याचा काल भरदुपारी कोथरूडमध्ये हत्या करण्यात आली. लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी गर्दीचा अंदाज साधत शरद मोहोळ याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. त्यात शरद मोहोळ याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात मुख्य सुत्रधार साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याला पोलिसांनी अटक केली असून शरद मोहोळ याच्या हत्येची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला
गॅगस्टर शरद मोहोळ हा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा गावाचा रहिवाशी आहे. त्याचे आई-वडिल सामान्य शेतकरी असून २०१८ साली मुळशी पॅटर्न चित्रपट आला होता. हा चित्रपट संदीप मोहोळ याच्या जीवनावर आधारीत होता. त्या संदीप मोहोळच्या गाडीवर शरद मोहोळ हा चालक होता. २००६ मध्ये मारणे गॅंगच्या सुधीर रसाळ याची संदीप मोहोळ याने हत्या केली होती. या हत्येनंतर पुणे शहरात गॅंगवार सुरू झाले.
हेही वाचा…पुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर
सुधीर रसाळ याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मारणे गॅगने संदीप मोहोळ याची हत्या केली. संदीप मोहोळ याची हत्याही मारणे गॅंगने नियोजनपुर्वक केली. संदीप मोहोळ मोटारीतून जात होते. ती मोटोर बुलेटप्रुफ असल्याचे मारणे टोळीला वाटले. यामुळे पौड फाट्यावर त्यांची गाडी थांबताच गाडीचे काच फोडले. त्यानंतर संदीप मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. संदीप मोहोळ यांची हत्या झाली तेव्हा त्याची गाडी शरद मोहोळ चालवत होता. ही घटना शरद मोहोळ याची गुन्हेगारी विश्वात एंन्ट्री करणारी ठरली.
संदीप मोहोळ याच्या हत्येनंतर शरद मोहोळ याने गॅंगची सुत्रे हाती घेतली. २०१९ मध्ये संदीप याच्या हत्येचा बदला घेतला. संदीप मोहोळ याची हत्या करणारा किशोर मारणे याची हत्या शरद मोहोल याने केली. या हत्येसाठी शरद मोहोळ याला जन्मठेपीची शिक्षा झाली. त्या प्रकरणात तो जामिनीवर बाहेर आला होता. अन् त्याची हत्या आता साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने केली आहे. त्याच्यासह पोलिसांनी आठ जणांना अटक केली आहे. त्यामुळे आता हा गॅंगवार संपणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा..मावळ अन् शिरूर लोकसभेवरून महायुतीत पेच वाढला, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली
हेही वाचा..शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं