पुणे : पुढील लोकसभा जशी जशी जवळ येत आहे, तशा तशा राजकीय हालचाली वाढल्या आहेत. एका बाजूला शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभेवरून महायुतीत जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीच्या पक्षातील नेत्यांनी जागावाटपाच्या आधीच लोकसभा मतदारसंघात प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. पुण्यात मावळ, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक होत आहे. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मावळ आणि शिरूरमध्ये जाहीर सभा होत आहे. तिसऱ्या बाजूला अजित पवार गट देखील सक्रीय झाला आहे. त्यामुळे महायुतीत नेमंक काय चालुय? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…पुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर
मावळ लोकसभेसाठी विद्यामान खासदार श्रीरंग बारणे पुन्हा निवडणुक लढण्यास आग्रही आहे. तर या जागेवरून भाजपचे शहाराध्यक्ष बाळा बेगडे यांनी देखील दावा सांगितला आहे. यातच अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघ आपल्यालाच मिळावा, अशी भूमिका अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी घेतली आहे. यातच श्रीरंग बारणे यांच्यासाठी एकनाथ शिंदे यांची सभा मावळात होत आहे.
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका
शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरूवातीपासून अजित पवार गटाने दावा सांगितला आहे. शिरूरचा उमेदवार निवडून आणणारच असं जाहीर विधान अजित पवारांनी केलं होतं. तर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी देखील या जागेवरून दंड थोपाटले आहेत. यातच शिरूरसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी देखील काल पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तसेच शिरूर भाजपलाच मिळावं असं या बैठकीत ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत आलबेल नसल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे. शहर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे नियोजन करण्यात आले असून भाजप युवा मोर्चा आणि ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहे. शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत मागील काही दिवसांपासून रस्सीखेच बघायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या बैठकीत आज काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…एकनाथ शिंदे आज लोकसभेचं रणशिंग फुंकणार, मावळात अन् शिरूरमध्ये सभा, विरोधकांमध्ये धडकी भरली
हेही वाचा..शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला