पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. लोकसभेच्या मिशन ४८ साठी आज शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळमध्ये खासदार श्रीरंग बारणे तर शिरूरमध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत.
हेही वाचा.. संपुर्ण देशभरात स्वच्छता मोहीम ; रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई, मंत्र्यांची खोचक टिका
भाजप पाठोपाठ शिंदे गटाने देखील लोकसभेच्या दृष्टीने शिवसंकल्प अभियान सुरू केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात सभा होणार आहेत. याची सुरूवात आज मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून केली जाणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे आजच्या सभेत नेमकं काय बोलणार ? त्याकडेही लक्ष लागून राहिलं आहे. तसेच या सभेसाठी महायुती मधील कोण कोणते नेते उपस्थित राहणार ? याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे.
हेही वाचा…“जितेंद्र आव्हाड जिथे दिसेल तिथे त्यांचं तोंड काळं करू,” हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याने ‘हा’ समाज आक्रमक
दरम्यान, एकनाथ शिंदे यांची शिरूरमध्ये सभा होत आहे. त्यावर अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा मतदारसंघात येताहेत. त्यांच मी मनापासून स्वागत करतोय, खरं शेतकऱ्यांच्या आक्रोश मुख्यमंत्र्यांच्या कानावर पोहचला असेल. त्यांच्या सभेकडे भाषणाकडे माझं लक्ष राहणार आहे. यातच शासनाच्या योजना किंवा सामान्य माणसांसाठी काही घेऊन आले असते तर नक्कीच आनंद झाला असता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या निर्यातबंदी विषयी बोलावं. दुधाला सरसकट पाच रूपये देण्याच्यासंदर्भात बोलावं. बिबट प्रवण भागाविषयीही बोलावं, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..शरद मोहोळचा गेम कुणी केला ? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, म्हणाले..
हेही वाचा…“जो उमेदवार जिंकणार त्याला जागा देणार”, लोकसभेसाठी ठाकरेंचा फॉर्म्युला ठरला
हेही वाचा…शरद मोहोळची ह’त्या का केली? कारण आलं समोर, पोलिसांनीही आरोपींना फिल्मी स्टाईने पकडलं
हेही वाचा..ठाकरेंनी पदावरून हाकललं, ठाकरेंचा ‘हा’ शिवसैनिक पत्रकार परिषदेत ढसाढसा रडला
हेही वाचापुण्यात गॅंगस्टर शरद मोहोळचा गेम कुणी केला ? दोन नावं आली समोर